रुग्णांच्या नातेवाईकांना 'इथं' मिळतंय मोफत जेवण, जालन्यातील संस्था 7 वर्षांपासून करतेय मोठं काम
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना शहरातील लॉयन्स क्लब गोल्ड ही संस्था मागील 7 वर्षांपासून अन्नदानाचे काम करत आहे. या संस्थेमार्फेत शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत अन्नछत्र उपक्रम राबविला जात आहे.
शहरामध्ये ग्रामीण भागातील रुग्ण अॅडमिट झाल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण त्यांच्या नातेवाईकांच्या जेवण्याच्या डब्याची असते. त्यामुळे हिच जेवण्याच्या डब्याची अडचण दूर करण्याचे काम जालना शहरातील लॉयन्स क्लब गोल्ड ही संस्था मागील 7 वर्षांपासून करत आहे. या संस्थेमार्फेत शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत अन्नछत्र उपक्रम राबविला जात आहे.
advertisement
advertisement
लॉयन्स क्लब जालना ही संस्था जालना शहर आणि जिल्ह्यातील गरजू घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असते. लॉयन्स क्लबच्या अनेक शाखा आहेत. त्यापैकी लॉयन्स क्लब गोल्ड या शाखेने 7 वर्षांपूर्वी शहरातील चमन येथे असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अन्नछत्र हा उपक्रम सुरू केला असून या अंतर्गत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना सकाळी आणि संध्याकाळी मोफत भोजन दिले जाते.
advertisement
advertisement
advertisement
लॉयन्स क्लबच्या मीनाक्षी दाड, राम देवश्रोत्री आणि माझ्या माध्यमातून हा उपक्रम मागील 7 वर्षांपासून अविरतपणे सुरू असून पुढे देखील असाच सुरू राहील. या उपक्रमाची कल्पना ही रामदेव श्रोत्री यांची होती. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. यातून एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते आणि गरजू नातेवाईकांची मदत होते. त्यांनाही यातून समाधान मिळत असल्याची भावना लॉयन्स क्लब बोर्डचे सचिव अशोक हुरघट यांनी व्यक्त केली.