Weather Alert : महाराष्ट्रावर आता नव संकट, पारा घसरणार; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पाहुयात 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरांसह विभागवार हवामान कसे असेल.
1/7
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसानंतर राज्यामध्ये थंडीचं आगमन झालं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये हाडं गोठवणारी थंडी पाहायला मिळतेय. तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पाहुयात 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरांसह विभागवार हवामान कसे असेल.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे निरभ्र आकाश राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल. राज्याच्या तुलनेत मुंबई आणि कोकणामध्ये थंडी नगण्य असल्याचं पाहायला मिळतंय.

3/7
पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. तर कोल्हापूरमध्ये किमान तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत असल्याचं पाहायला मिळतंय. पावसाने मात्र आता राज्याच्या सर्व विभागातून माघार घेतली आहे.

4/7
उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये किमान तापमानाचा पारा केवळ 10 अंश सेल्सिअसपर्यंत येण्याची शक्यता आहे, तर नाशिकमध्ये ही किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकतं.

5/7
मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर, परभणी यांसारख्या शहरातील किमान तापमान हे 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्येही तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून आकाश निरभ्र असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस मराठवाड्यात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

6/7
विदर्भामध्ये देखील किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. तर नागपूरमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

7/7
दरम्यान आगामी काळामध्ये तापमानाचा पारा हा घटलेलाच राहणार असून राज्यभर थंडी पाहायला मिळेल. सध्या राज्यात नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर पाहायला मिळतोय. तर पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात नगण्य थंडी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement