विदर्भात 2 दिवस धो धो सुरूच राहणार, काय आहे हवामान विभागाचा अलर्ट?

Last Updated:
Heavy rain in Vidarbha: विदर्भात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
1/5
राज्यातील विविध भागात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावलीये. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पुढील 2 दिवस धो धो पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाये.
राज्यातील विविध भागात पुन्हा जोरदार हजेरी लावलीये. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पुढील 2 दिवस धो धो पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाये.
advertisement
2/5
विदर्भातील भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे.

3/5
भंडारा जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले ओसांडून वाहत आहे. त्यामुळे आज शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

4/5
गडचिरोलीमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयासोबत संपर्क तुटला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

5/5
विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement