advertisement

पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार रहमान डकैत? IKKA मध्ये अक्षय खन्नाचा खुंखार अंदाज, सनी देओलला देणार टक्कर

Last Updated:

IKKA Teaser Released: नेटफ्लिक्स इंडियाने आज ३ फेब्रुवारी रोजी 'इक्का' या त्यांच्या आगामी लीगल ड्रामाचा पहिला धमाकेदार टीझर रिलीज केला असून, सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

News18
News18
मुंबई : १९९७ ऐतिहासिक 'बॉर्डर' चित्रपटातून सनी देओल आणि अक्षय खन्ना या जोडगोळीने पडद्यावर जो थरार निर्माण केला होता, तो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता तब्बल २९ वर्षांनंतर ही जबरदस्त जोडी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने आज ३ फेब्रुवारी रोजी 'इक्का' या त्यांच्या आगामी लीगल ड्रामाचा पहिला धमाकेदार टीझर रिलीज केला असून, सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

सनी पुन्हा वकिलाच्या भूमिकेत

टीझरमध्ये सनी देओल काळा कोट घालून कोर्टात युक्तिवाद करताना दिसतोय. त्याला पाहून चाहत्यांना 'दामिनी'मधील 'तारीख पे तारीख' म्हणणाऱ्या गोविंदची आठवण झाली आहे. मात्र, यावेळी प्रकरण वेगळं आहे. सनी एका अशा प्रामाणिक वकिलाची भूमिका साकारत आहे, ज्याला एका खुनाच्या आरोपीचा बचाव करण्यासाठी भाग पाडलं जातं. विशेष म्हणजे, हा आरोपी असा व्यक्ती आहे ज्याचं करिअर याच वकिलाने उद्ध्वस्त केलं होतं. आता आपल्या प्रिय व्यक्तींना वाचवण्यासाठी सनीला नैतिकतेचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही केस जिंकायची आहे.
advertisement

29 वर्षांनंतर सनी-अक्षय आमने सामने

दुसरीकडे, अक्षय खन्ना नेहमीप्रमाणे आपल्या डोळ्यांनी आणि डायलॉग्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवताना दिसतोय. टीझरमध्ये तो साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा असून त्याचा लूक अत्यंत डेंजरस वाटतोय. दरम्यान, या टीझरवर एका चाहत्याने कमेंट केली, "अक्षय पुन्हा एकदा 'रहमान डकैत' मोडमध्ये परतलाय की काय!" या दोन दिग्गज कलाकारांमधील जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते आता प्रचंड उत्सुक आहेत.
advertisement
advertisement

दिग्दर्शन आणि तगडी स्टारकास्ट

'महाराज' सारखा गाजलेला चित्रपट देणारे सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'इक्का'मध्ये केवळ सनी आणि अक्षयच नाही, तर दिया मिर्झा, तिलोत्तमा शोम, संजीदा शेख, शिशिर शर्मा आणि आकांक्षा रंजन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अल्थिया कौशल आणि मयंक तिवारी यांनी याचं लेखन केलं आहे.
advertisement

बॉक्स ऑफिसवर सनीचा बोलबाला

सनी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा 'बॉर्डर २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून केवळ दोन आठवड्यांत या सिनेमाने २८० कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे अक्षय खन्नानेही रणवीर सिंगसोबतच्या 'धुरंधर' चित्रपटातून आपली ताकद दाखवून दिली आहे. १९ मार्चला धुरंधरचा दुसरा भाग रिलीज होणार असून आजच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार रहमान डकैत? IKKA मध्ये अक्षय खन्नाचा खुंखार अंदाज, सनी देओलला देणार टक्कर
Next Article
advertisement
सोन्या, चांदीने खरे रंग दाखवले, ओव्हरसोल्डनंतर दिला सर्वात मोठा झटका; वर्ल्ड मार्केटमध्ये उलथापालथ, गुंतवणूकदारांची धडधड वाढली
सोन्या, चांदीने खरे रंग दाखवले; ओव्हरसोल्डनंतर दिला सर्वात मोठा झटका
  • सोनं-चांदीत ऐतिहासिक उसळी, गुंतवणूकदार थक्क

  • ग्लोबल मेटल मार्केटमध्ये खळबळ

  • 2008 नंतरचा सर्वात मोठा सोन्याचा झटका

View All
advertisement