पुढील 2 दिवस विदर्भासाठी महत्वाचे, पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पुढील 2 दिवसांत विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्यात काही दिवसांपासून वातावरणामध्ये खूप बदल होतांना दिसून येत आहे. कुठे उष्णतेचा पारा तर कुठे पावसाचा जोर कायम आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेलेले दिसून येत आहे. विदर्भावरही सध्या दुहेरी संकट असल्याचे दिसू येत आहे. काही भागांत तापमानाचा पारा वाढलाय तर काही भागांत पावसाचा जोर वाढलाय.
advertisement
advertisement
या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये आज 30 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे. उर्वरित जिल्ह्यांत पुढील 2 दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवस विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement