Vidarbha Weather: विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच, नागपूरसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, आज होरपळणार!
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vidarbha Weather: एप्रिल महिन्यात विदर्भात उष्मतेची लाट असून तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार गेला आहे. आज काही जिल्ह्यांन उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गोंदिया, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांतील कमाल तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस इतके असून किमान तापमान 23 ते 27 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
गेले तीन दिवस सतत उष्णतेची लाट असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढत असल्याने आरोग्याची काळजी घेण्यासोबतच काही पथ्ये सुद्धा पाळणे गरजेचे आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. तसेच भरपूर पाणी प्यावे. काही त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.








