आजचं हवामान: विदर्भात 24 तासांत हवापालट, अमरावतीसह या जिल्ह्यांवर नवं संकट, नागपुरात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भात उष्मतेची लाट कायम असून पुढील 24 तासांत हवापालट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुन्हा इशारा दिला आहे.
विदर्भात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. 25 एप्रिल रोजी सुद्धा नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसवर कायम आहे. त्याचबरोबर हीट वेव्ह कायम आहे. यामुळे जनजीवनावर उष्णतेचा मोठा परिणाम जाणवत असून, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
advertisement
नागपूरमध्ये किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असून कमाल तापमान 45 अंश अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे. शहरात सध्या तीव्र उष्णतेची लाट अनुभवली जात आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
अमरावतीतही 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहणार असून, त्यानंतर ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातही तापमान 45 अंश सेल्सिअस वर तापमान स्थिर असून, सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. वर्धा जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून, हवामान अंशतः ढगाळ झाले आहे. पुढील दोन दिवसांत त्याठिकाणी पावसाची शक्यता आहे.
advertisement
बुलढाणा जिल्ह्यात सध्या आकाश मुख्यतः निरभ्र असून, उष्णता जाणवत आहे. पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस असून, येथेही हीट वेव्ह कायम आहे. मात्र पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण होऊन थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
advertisement
advertisement
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, थंड पेयांचा वापर करावा. लहान मुले, वृद्ध आणि ज्या व्यक्तींना आधीपासून आरोग्य समस्या आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. उन्हात जाताना डोक्यावर टोपी घालावी, गॉगल्स व हलक्या रंगाचे कपडे वापरावेत, असेही सांगण्यात आले आहे.
advertisement
पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत ढगाळ वातावरणामुळे तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी तापमानात फार मोठा बदल होणार नाही. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करणे आवश्यक आहे.


