मराठवाडा, विदर्भाला पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा! कुठं किती असेल तापमान?

Last Updated:
Weather forecast: राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यासह, विदर्भातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालेलं असतानाच इथं पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज, 4 सप्टेंबर रोजी राज्यांच्या विविध भागांमध्ये नेमकं किती तापमान असेल, याचा अंदाज घेऊया. (शिवानी धुमाळ, प्रतिनिधी / पुणे)
1/5
मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तसंच काही भागात हलका पाऊस पडू शकतो. मुंबईसह पालघर, ठाणे, डोंबिवली याठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण असेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईचं कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 21°C इतकं असू शकतं.

advertisement
2/5
पुण्यात आज हलक्या पावसाची शक्यता आहे, काही भागात ऊन पडेल. घाटमाथ्यावर मात्र पावसाची संततधार असू शकते. पुण्याचं तापमान आज 29°C कमाल आणि 22°C किमान असण्याचा अंदाज आहे.

3/5
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये आज 30°C कमाल आणि 22°C किमान तापमान असेल.

4/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून येत्या आठवड्यात मराठवाड्यात जोरदार पाऊस पडेल, असं हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 29°C कमाल आणि 20°C किमान तापमान असेल.

5/5
 एकंदरीत  मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये  आहे. त्यामुळे नागरिकांना  घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.
एकंदरीत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement