दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यानं केली अमेरिकन फळाची लागवड; 150 झाडांपासून आता लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या शेतकऱ्यानं अमेरिकन फळाची शेती केली असून त्यामधून लाखोंची कमाई केलीय.
शेतीमध्ये नफा मिळवायचा असेल तर लागवडीची, पिकांची पद्धत ही बदलली पाहिजे. शेतीचा पॅटर्न बदलला तर नफा मिळतो, हे यापूर्वीही सिद्ध झालंय. बीड सारख्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनीही आता शेतीत प्रयोग सुरू केलेत. येथील या शेतकऱ्यानं अमेरिकन फळाची शेती केली असून त्यामधून लाखोंची कमाई केलीय.
advertisement
बीड जिल्ह्यातल्या शिवनी या गावातले प्रगतीशील शेतकरी परमेश्वर थोरात हे त्यांच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी यावेळी एक नवा प्रयोग केलाय. अमेरिकेतल्या मॅक्सिमा विद्यापीठानं विकसित केलेल्या एवोकोडा या फळाची लागवड त्यांनी शेतीत केलीय. हे फळ आता काढणीला आलंय. या फळाच्या विक्रीतून त्यांनी लाखोंची कमाई केलीय.
advertisement
advertisement
advertisement