27 सदस्यांच्या एकत्र कुटुंबाचा अनोखा आदर्श, एकोपाच ठरतोय प्रगतीचा मूलमंत्र PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
खडकी येथील शिंगटे कुटुंबात एकूण 27 सदस्य असून ते गुण्यागोविंदानं एकत्र राहत आहेत. त्यांच्या याच वैशिष्ट्याची पंचक्रोशित चर्चा आहे.
एकत्र कुटुंब म्हटले की भावा-भावाचे वाद, जावा-जावांचा अबोला, जमिनीवरून भांडण, कामावरून वाद अशा गोष्टी कायम कानावर येत असतात. तरीही अनेक कारणांनी एकत्र कुटुंब पद्धती आदर्शच मानली जाते. ही परंपरा चौकोनी आणि छोट्या कुटुंब पद्धतीत लुप्त होत आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणारं एक कुटुंब याला अपवाद आहे. खडकी येथील शिंगटे कुटुंबात एकूण 27 सदस्य असून ते गुण्यागोविंदानं एकत्र राहत आहेत. त्यांच्या याच वैशिष्ट्याची पंचक्रोशित चर्चा आहे.
advertisement
खडकी येथील शिंगटे कुटुंब पूर्वापार शेतकरी असून 5 भाऊ एकत्र राहतात. त्यामुळे घरात एकूण 27 सदस्य आहेत. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने सर्वजण उदरनिर्वाहासाठी शेतीच करतात. आपल्या 25 एकर शेतीतून सर्व भावंडांनी मोठी प्रगती केली आहे. वडिलांनी केलेलं नियोजन आणि दिलेल्या जबाबदाऱ्या प्रत्येक भाऊ जबाबदारीने पार पाडत आहे.
advertisement
advertisement
advertisement
एकत्रित कुटुंबातून व्यावसायिक, नगदी वार्षिक पिके व जोडीला हंगामी पिके अशी पीक पद्धती असते. दरवर्षी 12 ते 13 एकरांत सुरू हंगामातील ऊस असतो. इतर बागायती पिके घेऊन वार्षिक लाखो रुपयांचे उत्पादन हे एकत्र कुटुंब घेत असतं. एकूण क्षेत्रातून सरासरी 700 ते 750 टन ऊस दरवर्षी कारखान्याला पुरविला जातो. सरासरी 6 एकरांत हळद असते. त्यातून एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते. एकूण उत्पादनाच्या दहा टक्के हळदीची पावडर करून विक्री होते. या व्यतिरिक्त ज्वारी, भुईमूग, भात आदी हंगामी पिके व चारा पिकेही असतात.
advertisement
advertisement
शिंगटे कुटुंबाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जण एकोप्याने राहतात. रात्रीचे जेवण सर्व जण एकत्र करतात. तेथूनच दुसऱ्या दिवशीच्या कामांचे नियोजन एकमेकांच्या समन्वयाने होते असते. प्रत्येक जण आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत असतो. एकाने दुसऱ्याला मदत करायची. कोणी कोणाशी अबोला धरायचा नाही, असा कुटुंबाचा नियमच आहे. सर्वांच्या एकत्रित श्रमातूनच कुटुंबाने शेतीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे, असे प्रशांत शिंगटे सांगतात.