महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी वर्ध्याच्या मातीत, नोकरी सोडून दाम्पत्य करतंय लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
वर्ध्यातील दाम्पत्यानं नोकरी सोडून सेंद्रीय शेती सुरू केली. महाबळेश्वरच्या मातीत पिकणारी लालबुंद स्ट्रॉबेरी आता विदर्भात पिकतेय.
 <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्ध्यातील</a> एक उच्चशिक्षित शेतकरी दाम्पत्य महाबळेश्वर येथे फिरायला गेलं. वडिलोपार्जित शेतजमीन असल्यामुळे शेतीची प्रचंड आवड. त्यामुळे खाजगी नोकरी सोडून दोघांनीही सेंद्रिय शेतीकडे पावले वळवली. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असल्याने तिथून स्ट्रॉबेरी पिकाची माहिती घेतली.
advertisement
advertisement
advertisement
आजपर्यंत महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद विदर्भवासी घ्यायचे मात्र या दाम्पत्याने वर्ध्यातच स्ट्रॉबेरी पिकवून नाविन्यपूर्ण शेतीचा सुखद अनुभव घेतलाय. हे दोघेही खाजगी नोकरी करत होते. मात्र शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोगाची संकल्पना डोक्यात होती. त्यामुळे नोकरी सोडून स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्धार केला. आता हीच स्ट्रॉबेरी या दाम्पत्याला लाखोंचा फायदा मिळवून देतेय.
advertisement
advertisement
advertisement
सोबतच जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी पुढे येण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडूनही केलं जात असून पाटील यांनी पाच एकर जमिनीवर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण आठ शेतकऱ्यांची मिळून 11 एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केलीय. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चव वर्धाच्या मातीतून विदर्भाला अधिक गोडव्यासह चाखायला मिळते आहे.


