पाहुण्यांना चिकन खाऊ घालणे पडले महागात, नंतर सासू-सूनेनं कमालच केली, नेमकं काय घडलं?

Last Updated:
घरी कुणी पाहुणे येणार असतील आणि त्यांना मांसाहार आवडत असेल तर त्यांच्यासाठी मांसाहारी पदार्थांची मेजवानी दिली जाते. यामध्ये मटण, चिकन, मासे असे जेवण बनवले जाते. यासाठी सामान्य अन्नपदार्थाच्या तुलनेत खर्च येतो. मात्र, यात एका कुटुंबीयांना जो अनुभव आला आणि त्यातून त्यांनी जो निर्णय घेतला, तो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (नीरज कुमार/ बेगूसराय, प्रतिनिधी)
1/8
जेवणात मांस आणि मासेसोबत चिकन खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. आता ग्रामीण भागात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये मटणाची मागणी वाढल्याने दरही वाढले आहे.

advertisement
2/8
बेगूसराय येथील एका कुटुंबीयांनी आपल्या घरी दिलेल्या जेवणाचा खर्च पाहून कुक्कुटपालन सुरू केले. हे काम ते हायटेक पद्धतीने करत आहेत.

3/8
तंत्रज्ञानावर आधारित शेती व्यवसाय त्यांच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरला आहे. तुम्हीही कुक्कुटपालन करून कमी वेळेत चांगला नफा कमवू शकता, असा सल्ला हे कुटुंबीय आता सर्वांना देत आहे.

4/8
सुमित्रा देवी यांचे हे कुटूंब आहे. त्यांनी सांगितले की, त्या त्यांची सून नीलम देवी आणि मुलगा पिंटू कुमार यांच्यासोबत पोल्ट्री फार्म चालवतात. त्यांनी तीन वर्षांपूर्वी एक लाख रुपयांचे भांडवल गुंतवून त्याची सुरुवात केली.

5/8
त्यावेळी त्यांच्याजवळ 1000 कोंबडीचे पिल्लू होते. त्यांना जीविकाकडून 50 हजार रुपयांचे कर्जही मिळाले होते. मग हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढला.

6/8
आज त्यांच्या फॉर्ममध्ये 4000 पिल्लू आहेत. सासू, सून आणि मुलगा यांच्यात कामाची विभागणी करण्यात आलेली आहे. कोंबड्यांना ग्लुकोज आणि औषध देणे हे सुमित्रादेवी यांचे काम आहे. खाऊ घालणे आणि तापमान नियंत्रित करणे हे सुनेचे काम तर मार्केटिंग हे मुलाचे काम आहे. जीविकाची टीम महिन्यातून एकदा तपासणीसाठी येते.

7/8
सुमित्रा देवी यांनी सांगितले की, 4 हजार पिल्लूंना दोन-दोन किलोचा कोंबडा तयार करण्यासाठी 50 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. पिल्लू आणण्यापासून ते कोंबडा तयार करुन विकण्यापर्यंत दोन महिन्यात 3 लाख रुपयांचा खर्च होतो.

8/8
तर तयार कोंबडी बाजारात विकून पाच लाख रुपये मिळतात. अशा प्रकारे दोन महिन्यांत 2 लाख रुपयांची कमाई होते. मात्र, वर्षातून एकदा उन्हाळी हंगामात रोगराईमुळे नुकसान होण्याची भीती असते, असेही त्यांनी सांगितले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement