Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं? टेन्शन नाही वापरा ही ट्रिक
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गोल्ड ETF द्वारे तुम्ही 1000 रुपयांपासून सोन्यात डिजिटल गुंतवणूक करू शकता, मेकिंग चार्ज नाही, शुद्धता 99.5 टक्के, चोरीची भीती नाही आणि त्वरित विक्री शक्य.
आजकाल सोनं खूप महाग होत चाललं आहे. सोनं घेणं परवडणार नाही असं म्हटलं जात आहे. पण तुमच्या बजेटमध्ये अजूनही सोनं घेण्याची संधी आहे असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर? विश्वास बसणार नाही, म्हणाल मस्करी करते, पण खरंच तुम्ही तुमच्या बजेटमध्ये सोनं घेऊ शकता. अगदी 1000 रुपयांपासून तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता तेही अगदी सुरक्षितरित्या. ना ज्वेलर्सकडे पैसे देण्याची भीती ना तो पळून जाण्याची भीती.
advertisement
भारतात सोनं खरेदी करणं ही फक्त परंपरा नाही, तर तो एक भावनिक आणि गुंतवणुकीचा विषय आहे. आतापर्यंत आपण सोनारच्या दुकानात जाऊन दागिने किंवा नाणी खरेदी करायचो. पण आता जमाना बदलला आहे. कपाटात सोनं ठेवण्यापेक्षा ते मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवून त्यातून कमाई करण्याचा एक स्मार्ट मार्ग सध्या लोकप्रिय होतोय, तो म्हणजे गोल्ड ETF प्रकार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सोनं महाग असलं तरी आता तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल इतक्या छोट्या रकमेतूनही सोन्यात गुंतवणूक करू शकता.
advertisement
गोल्ड ETF म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, गोल्ड ETF हा सोन्याच्या भावावर चालणारा एक प्रकारचा 'म्युच्युअल फंड' आहे. यात तुम्ही प्रत्यक्ष सोन्याचं बिस्किट किंवा दागिना घरी आणत नाही, तर सोन्यात 'इलेक्ट्रॉनिक' पद्धतीने गुंतवणूक करता. शेअर बाजारात जसे शेअर्स खरेदी-विक्री केले जातात, अगदी तसेच तुम्ही सोन्याचे युनिट्स खरेदी करू शकता. जेव्हा तुम्ही हे युनिट्स विकता, तेव्हा सोन्याच्या त्यावेळच्या बाजारभावानुसार पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








