HSRP Number Plate ची मुदत संपली, तुम्ही अजूनही नंबरप्लेट बसवली नसेल तर काय होणार? दंड की...
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत संपली तरी परिवहन विभागाने कारवाई थांबवली आहे. नवीन एजन्सी निवड प्रक्रियेत असून वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. मुदत संपल्यामुळे आता आरटीओ किंवा पोलीस दंड आकारणार का? अशी भीती वाहनधारकांमध्ये होती. त्यात पुन्हा मुदतवाढ देखील देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न होता. मात्र ज्यांनी ही नंबरप्लेट बसवली नाही त्यांना दिलासा मिळार आहे.
advertisement
परिवहन विभागाने तूर्त अशा वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांच्या गाड्यांना अजूनही नवीन प्लेट लागलेली नाही, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात जुन्या गाड्यांना नंबर प्लेट लावण्यासाठी यापूर्वी रोमजार्टा सेफ्टी सिस्टिम, रियल मेजॉन इंडिया आणि एफ टी ए एचएसआरपी सोल्यूशन्स या तीन एजन्सींची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता या कंत्राटदारांची मुदत संपली आहे.
advertisement
advertisement
ज्यांनी ऑनलाई नोंदणी केली मात्र नंबरप्लेट बसवून घेतली नाही त्यांना 1000 रुपये दंड तर ज्यांनी कोणतीही प्रक्रियाच सुरू केली नाही त्यांना 10 हजार दंड असा नियम सरकारने आणला होता. मात्र आता वाहनांवर कारवाई करायची की नाही याबाबत सध्या संभ्रम आहे. त्यामुळे तूर्तास ही कारवाई थांबवली आहे. यासाठी किती मुदत आहे ते देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
advertisement
advertisement
advertisement










