एकाच पोरीवर दोघांचं प्रेम, लव्ह ट्रँगलमधून तरुणाची सिनेस्टाईल हत्या, भरबाजारात रंक्तरंजित थरार!

Last Updated:

Jalgaon Love Triangle News: जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी रक्तरंजित थरार बघायला मिळाला आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी रक्तरंजित थरार बघायला मिळाला आहे. एकाच तरुणीसोबत असलेल्या मैत्रीच्या वादातून इंजिनिअरींगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा सिनेस्टाईल पाठलाग करून खून करण्यात आला आहे. आरोपीनं भरबाजारात तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून बाजारपेठेत भीतीचं वातावरण पसरलं आहे.
साई गणेश बोराडे (उर्फ जय गोराडे, रा. दशरथनगर) असं मयत तरुणाचं नाव असून तो अभियांत्रिकी (डिप्लोमा) शिक्षण घेत होता. या प्रकरणी संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्राथमिक माहितीनुसार, एकाच मैत्रिणीवरून साई बोराडे आणि शुभम सोनवणे यांच्यात मागील तीन वर्षांपासून वाद सुरू होता. याच वादातून बुधवारी दुपारी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मैत्रीच्या नावाखाली बोलणाऱ्या एका तरुणीसोबत साईचं प्रेमप्रकरण असल्याचा संशय शुभमला होता. या संशयातूनच त्याने साईवर धारदार चाकुने हल्ला केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
advertisement
बुधवारी दुपारी साई बोराडे गोलाणी मार्केट परिसरात आला होता. यावेळी शुभम सोनवणे याच्याशी त्याचं भांडण झालं. भांडणाचे रूपांतर झटापटीत झालं आणि त्यानंतर शुभमने साईचा सिनेस्टाईल पाठलाग करत छाती आणि पोटावर चाकूने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत साई रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने रिक्षाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढे एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.
advertisement
दरम्यान, याच वेळी जळगाव महापालिकेत उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होती. महापालिकेच्या मागील बाजूस असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये ही घटना घडल्याने परिसरात काही काळ भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.

घटनास्थळी पोलिसाने आरोपीला पकडून ठेवलं

घटनेच्या वेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी रमेश चौधरी हे त्या मार्गावरून जात असताना त्यांना शुभम सोनवणे साईवर चाकुने वार करत असल्याचं दिसलं. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून शुभमला पकडून ठेवले आणि शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शुभमला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.
advertisement

एकाच पोरीवर दोघांचं प्रेम, तीन वर्षांपासून वाद

साई बोराडे हा देवकर महाविद्यालयात डिप्लोमा द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूनंतर मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. एकाच मैत्रिणीच्या कारणावरून तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला वाद अखेर जीवघेण्या घटनेत रूपांतरित झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शुभम रवींद्र सोनवणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकाच पोरीवर दोघांचं प्रेम, लव्ह ट्रँगलमधून तरुणाची सिनेस्टाईल हत्या, भरबाजारात रंक्तरंजित थरार!
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement