Salary Hikeसाठी 2025 वाईट वर्ष, वर्षभर मेहनत करून किती टक्के पगार वाढ मिळणार, समोर आला आकडा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Salary Hikes In India: जर तुम्ही नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. एका सर्व्हेनुसार या वर्षी भारतातील पगार वाड ही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असणार असल्याचे म्हटले आहे.
advertisement
2025 मध्ये भारतातील नोकरदार वर्गासाठी सरासरी 9.2% वेतनवाढ होण्याचा अंदाज आहे. ही वाढ मागील तीन वर्षांतील सर्वात कमी दर ठरू शकते, असे Aon या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीच्या वार्षिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. ही पगार वाढ 2024 मधील 9.3% च्या तुलनेत किंचित कमी असली, तरी 2022 मध्ये झालेल्या 10.6% च्या वाढीच्या तुलनेत बरीच कमी आहे. करोनानंतर झालेली मोठी वेतनवाढ आता कमी होत असल्याचे संकेत या अहवालातून मिळत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
याउलट उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग), ऑटोमोबाईल आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) ही क्षेत्रे वेतनवाढीच्या बाबतीत आघाडीवर राहतील. अभियांत्रिकी डिझाइन आणि ऑटोमोबाईल उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक 10.2% वाढ होण्याची शक्यता आहे. GCCs (ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स) आणि किरकोळ विक्री (रिटेल) क्षेत्रात अनुक्रमे 9.7% आणि 9.8% वेतनवाढ अपेक्षित आहे. NBFC (नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या) 10% वेतनवाढ देण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रात 8.8% वेतनवाढ अपेक्षित आहे.
advertisement
कर्मचारी स्थलांतर दर (Attrition Rate) कमी होत आहे, याचा अर्थ रोजगार बाजार स्थिर होत आहे. 2022 मध्ये "ग्रेट रेसिग्नेशन" काळात 21.4% कर्मचारी नोकऱ्या सोडत होते, तो दर आता 2024 मध्ये 17.7% वर आला आहे. कंपन्यांकडे आता जास्त प्रमाणात तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्यामुळे कंपन्या दीर्घकालीन कामगिरीसाठी योग्य निर्णय घेत आहेत.
advertisement
advertisement
Aon च्या अहवालानुसार, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, अमेरिका-चीन व्यापार धोरणे, मध्य पूर्वेतील संघर्ष, आणि AI क्षेत्रातील वेगवान प्रगती यामुळे वेतनवाढीचा वेग कमी झाल्याचे दिसून येत आहे. कंपन्यांना आता नवीन कौशल्य विकसित करणे, कर्मचारी प्रशिक्षण आणि टेक्नोलॉजीचा योग्य वापर करणे यावर भर द्यावा लागेल. भारताच्या वेतनवाढीतील हा बदल कंपन्यांच्या सावध आर्थिक नियोजनाच्या धोरणाचा एक भाग असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.