कॅशचं सोनं करून टाका! एका कॉलने घात, 130000000 रुपयांचं डील फसलं अन् CBI च्या जाळ्यात अडकल्या डेप्युटी कमिश्नर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
झाशीच्या CGST डेप्युटी कमिश्नर प्रभा भंडारी यांना 70 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी CBI ने अटक केली. सोनं, चांदी, 9 कोटींची मालमत्ता जप्त; प्रशासकीय वर्तुळात खळबळ.
"मॅडम, पार्टीकडून ७० लाख रुपये आले आहेत..." फोनवर हा निरोप मिळताच झाशीच्या जीएसटी डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी आदेश सोडला, "ग्रेट! त्या रोख रकमेचं लगेच सोन्यात खरेदी करून टाका आणि मला आणून द्या." पण, समोरून बोलणारा त्यांचा सहकारी 'अनिल' हा सीबीआयच्या जाळ्यात अडकलेला होता आणि हा सगळा संवाद रेकॉर्ड होत होता, याची कल्पनाही भंडारींना नव्हती.
advertisement
नेमकं काय घडलं? प्रभा भंडारी या २०१६ बॅचच्या आयआरएस (IRS) अधिकारी. सहा महिन्यांपूर्वीच त्यांची झाशीत बदली झाली होती. एका हार्डवेअर कंपनीची १३ कोटींची टॅक्स चोरी पकडल्यावर त्यांनी ती 'सेटल' करण्यासाठी चक्क दीड कोटींची लाच मागितली. दीड कोटींमधला पहिला ७० लाखांचा हप्ता घेताना त्यांचे दोन अधिकारी रंगेहाथ पकडले गेले.
advertisement
advertisement
सहा महिन्यांत जमवली 'माया' अवघ्या सहा महिन्यांच्या पोस्टिंगमध्ये भंडारींनी झाशीत स्वतःचा आलिशान फ्लॅट आणि महागड्या वस्तूंची खरेदी केली होती. सीबीआयच्या छाप्यात सोन्याची बिस्किटं, चांदी आणि नोटांची बंडलं पाहून अनुभवी अधिकारीही चक्रावून गेले. 'कॅशला सोन्यात बदलून' पुरावा नष्ट करण्याची त्यांची चाल त्यांच्याच अंगाशी आली.
advertisement
advertisement










