Pune Crime : इन्टाग्रामवर मैत्री अन् सुत जुळलं! पुण्यातील 19 वर्षाच्या तरुणीसोबत कोल्हापूरात घडलं भयंकर, भेटायला बोलवलं अन् चार दिवस...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kolhapur Youth cheats Pune Girl : पुण्यातील एक 22 वर्षीय तरुणी सोशल मीडियावरील एका मित्राच्या आमिषाला बळी पडून 4 दिवसांपूर्वी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाली होती.
Pune Crime News : प्रेमात वेडसर होणं हा आजकालचा ट्रेंड होत चाललाय. पुढचा मागचा विचार न करता तरुणाई मनसोक्त निर्णय घेत आहे. याचा परिणाम गुन्हेगारीच्या वाढत्या प्रभारावर दिसून येतो. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. पुण्यातील एका तरुणीसोबत कोल्हापुरात भयंकर घडल्याचं पहायला मिळालं. एक 19 वर्षाची पोरगी बाकड्यावर रडत बसली होती. त्यावेळी भयानक वास्तव समोर आलं.
बाकड्यावर 19 वर्षांची युवती रडत बसली
कोल्हापुरात 30 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पाटील गल्लीतील एका बाकड्यावर 19 वर्षांची युवती रडत बसलेली दिसली. ही बाब टिपू मुजावर यांच्या लक्षात येताच त्यांनी ओंकार पाटील यांना माहिती दिली. दोघांनी मिळून पोलिसात धाव घेतली अन् तरुणीची माहिती दिली. पोलिसांनी देखील तातडीने तरुणीच्या दिशेने धाव घेतली अन् नेमकं काय झालं? याची माहिती घेण्यास सुरूवात केली.
advertisement
ना स्वतःचा मोबाईल होता, ना प्रवासासाठी पैसे...
पुण्यातील एक 22 वर्षीय तरुणी सोशल मीडियावरील एका मित्राच्या आमिषाला बळी पडून 4 दिवसांपूर्वी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाली होती. संबंधित तरुणाने तिला कसबा बावडा परिसरात भेटायला बोलावले होते, मात्र प्रत्यक्षात तो तिथे आलाच नाही. त्या तरुणीकडे ना स्वतःचा मोबाईल होता, ना प्रवासासाठी पैसे... तो मित्र तिला तीन दिवस शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरवत राहिला आणि अखेर मंगळवारी त्याने दिलेला पत्ताही खोटा निघाला. तासनतास वाट पाहूनही तो तरुण न आल्याने पूर्णतः फसली गेल्याची जाणीव होताच ती तरुणी रस्त्यावर हताश होऊन रडू लागली.
advertisement
आईशी संपर्क साधला अन्...
भररस्त्यात एक तरुणी रडत असल्याचे पाहून परिसरातील काही सुजाण तरुणांनी तिची विचारपूस केली. सुरुवातीला ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, मात्र तरुणांनी विश्वास दिल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिच्या आईशी संपर्क साधला असता, पुण्यात आधीच ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्याचे समजले. आपली मुलगी कोल्हापुरात सुरक्षित असल्याचे ऐकताच आईला रडू कोसळलं. त्यांनी स्थानिक तरुणांना आपली मुलगी ताब्यात घेईपर्यंत सुरक्षित ठेवण्याची कळकळीची विनंती केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 11:54 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : इन्टाग्रामवर मैत्री अन् सुत जुळलं! पुण्यातील 19 वर्षाच्या तरुणीसोबत कोल्हापूरात घडलं भयंकर, भेटायला बोलवलं अन् चार दिवस...










