BMC Election: शिवसेना भवनात आज 'युवा' पर्व! अमित ठाकरे-आदित्य ठाकरे पहिल्यांदाच करणार युतीच्या उमेदवारांना मार्गदर्शन

Last Updated:

Aaditya Thackeray Amit Thackeray : ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आज महत्त्वाची घडामोड होणार आहे.

News18
News18
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबीय आणि मित्रपक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर, दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आज महत्त्वाची घडामोड होणार असून राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल होणार आहेत.
advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज दादर येथील शिवसेना भवनात दाखल होणार असून, यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती असणार आहे. या भेटीमुळे शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युतीच्या प्रचाराला नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेतील २२७ जागांसाठी युतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आज दुपारी २ वाजता शिवसेना भवनात या सर्व उमेदवारांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे संयुक्तपणे उमेदवारांना मार्गदर्शन करणार असून, प्रचाराची दिशा, स्थानिक मुद्दे, तसेच समन्वय साधून लढा कसा द्यायचा, यावर भर दिला जाणार आहे. आगामी प्रचाराच्या रणनितीबाबतही या बैठकीत स्पष्ट दिशा दिली जाण्याची शक्यता आहे.
advertisement

राज ठाकरेही ठेवणार शिवसेना भवनात पाऊल...

दरम्यान, ४ जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः शिवसेना भवनात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दिवशी युतीचा वचननामा जाहीर करण्यात येणार असून, हा कार्यक्रमही शिवसेना भवनातच होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली. युतीच्या वचननाम्यात मुंबईकरांच्या नागरी समस्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, घरबांधणी, तसेच मराठी अस्मितेशी संबंधित मुद्द्यांवर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.
advertisement
या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती देताना सांगितले की, शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युती पूर्ण ताकदीने मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहे. शिवसेना भवन हे या निवडणुकीचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. युतीचा वचननामा जाहीर करण्यासाठी शिवसेना भवनाशिवाय दुसरी योग्य जागा नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणाहून मराठी माणसाच्या लढ्यासाठीची रणनीती आखली, शिवसेनेची वाटचाल ठरवली. त्याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही या वास्तूशी संबंध आला आहे. त्यामुळे या ठिकाणी युतीचा वचननामा जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: शिवसेना भवनात आज 'युवा' पर्व! अमित ठाकरे-आदित्य ठाकरे पहिल्यांदाच करणार युतीच्या उमेदवारांना मार्गदर्शन
Next Article
advertisement
KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement