Women Success Story: शिक्षणानंतर परदेशात जाण्याचं स्वप्न अपूरं राहिलं, मुग्धाने सुरू केला केक व्यवसाय, महिन्याला इतकी कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Women Success Story: तिने बनवलेले केक्स आणि डेसर्ट्स इतके खास होते की ग्राहकांची पसंती मिळाली. हळूहळू तिच्या हातची चव ओळखली जाऊ लागली आणि त्याचाच परिणाम म्हणजे ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या प्रवासातला खरा टर्निंग पॉईंट ठरला गणेशोत्सव. लालबाग गणेशगल्ली येथे तिने 10 दिवसांचा स्टॉल लावला आणि तिच्या केक्सना आणि डेसर्ट्सला अफाट प्रतिसाद मिळाला. इथूनच तिची ओळख निर्माण झाली आणि अनेक ग्राहक कायमचे जोडले गेले. त्याच आधारावर तिने दर शनिवार-रविवारी स्टॉल लावायला सुरुवात केली आणि अखेर परळ व्हिलेजमध्ये शी फॉर केक या नावाने स्वतःचं शॉप सुरू केलं. यामधून महिन्याला ती 70 हजारांची कमाई करत आहे.
advertisement
advertisement
मुग्धा अभिमानाने सांगते, आज मी जिथे आहे, ते माझ्या ग्राहकांमुळे आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच शक्य झालं आहे. ती इतर महिलांनाही संदेश देते की, प्रयत्न केलेच पाहिजेत. पुढे काय होईल ते नंतर पाहू, पण ट्राय नक्की केला पाहिजे. या गणेशोत्सवात जर तुम्ही लालबागला जात असाल, तर शी फॉर केकचा स्टॉलला नक्कीच भेट द्या आणि तिच्या चविष्ट डेसर्ट्सचा अनुभव घ्या.