Photos: कापूस सारख्या दिसणाऱ्या या पिकाने शेतकऱ्याला बनवलं लखपती, आता वार्षिक 7 लाखांचं उत्पन्न

Last Updated:
भारतातील शेतकरी आधुनिक होत आहे. पारंपारिक शेती सोडून नवीन पद्धतींचा अवलंब करणारे अनेक शेतकरी आहेत आणि चांगला नफाही मिळवत आहेत. जालना (महाराष्ट्र) येथील एका शेतकरी दाम्पत्याने असेच काहीसे केले. पूर्वी हे दाम्पत्यही पारंपारिक पद्धतीने शेती करायचे, पण आता रेशीम उत्पादनातून त्यांची वार्षिक कमाई सात ते आठ लाखांवर गेली आहे.
1/5
पारंपारिक पिके घेणाऱ्या जालना जिल्ह्यातील भानुसे बोरगाव येथील शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ठरला. अवघ्या दोन एकरातून या शेतकऱ्याने रेशीम उत्पादनातून वर्षभरात सात लाख रुपये कमवले. भानुसे बोरगावच्या शरद भानुसे यांची ही यशोगाथा पाहूया.

advertisement
2/5
जालना जिल्ह्यातील भानुसे बोरगाव येथे राहणारे शरद भानुसे हे रेशीम लागवडीपूर्वी पारंपरिक पिके घेत असत. त्यांच्या शेतात कापूस, वाटाणा, सोयाबीन आदी पिके नियमित होती, परंतु या पिकांपासून त्यांना फारसे उत्पादन मिळाले नाही. काहीतरी नवीन करायचे त्यांनी ठरवले.

3/5
2018 मध्ये त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकरात तुतीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला नवीन असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र या अडचणींवर मात करत त्यांनी हार न मानता तुतीची लागवड सुरू ठेवली.

4/5
पहिल्या वर्षी चांगले आर्थिक उत्पन्न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या एकरात तुतीची लागवड केली. आता त्यांना रेशीम उत्पादनातून दरवर्षी सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. रेशीम उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नात ते समाधानी आहेत. या पिकाच्या पैशातून त्यांनी छान घर बांधलेय. 'तसेच त्यांची मुले शहरातील चांगल्या शाळेत शिकत आहेत,' असं भानुसे सांगतात.

5/5
शरद भानुसे यांच्या पत्नी भाग्यश्री भानुसे म्हणाल्या, "2014 च्या सुमारास आम्ही कापूस वेचत होतो. त्यातून वर्षाला सुमारे दीड लाखाचे उत्पादन घेतले, मात्र त्यासाठी 70 ते 75 हजार रुपये खर्च आला. आमच्याकडे वर्षाला 70 ते 80 हजार रुपये होते. पण रेशीम उत्पादनामुळे आमचे उत्पन्न वाढलेय.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement