DR Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांची भीमराव सकपाळ ते आंबेडकर व्हायची कहाणी, 2 वेळा आडनावं का बदलली?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
DR Babasaheb Ambedkar : थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं बालपण अत्यंत संघर्षात आणि सामाजिक भेदभावाच्या वातावरणात गेलं. जातिभेदामुळे बाबासाहेबांनी आपलं आडनाव बदललं.
बहुजन समाजाच्या उद्धारासाठी संघर्ष करणारे, राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशाचे पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी (14 एप्रिल 2024) जयंती आहे. थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं बालपण अत्यंत संघर्षात आणि सामाजिक भेदभावाच्या वातावरणात गेलं. जातिभेदामुळे बाबासाहेबांनी आपलं आडनाव बदललं. बाबासाहेबांनी दोनवेळा आपलं आडनाव बदललं. डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकर या आडनावाचा प्रवास नेमका कसा आहे. त्यामागे काय कारणं आहेत, ते सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
डॉ. बाबासाहेबांनी पूर्वायुष्यात सामाजिक भेदभाव सोसला. यातच त्यांच्या आडनावातल्या बदलाचा पाया रचला गेला. जातिभेदामुळे त्यांनी प्रथम भीमराव सकपाळ हे नाव बदलून भीमराव आंबवडेकर हे आडनाव स्वीकारलं. त्यानंतर ते भीमराव आंबेडकर या नावानं ओळखले जाऊ लागले. संघर्षाचे अनेक टप्पे पार केल्यानंतर अखेरीस बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर या नावानं सुपरिचित झाले.
advertisement
जातिभेदाशी लढा देणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकरांसाठी शिक्षणाचा पहिला टप्पा सोपा नव्हता. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना अनेक वेळा वर्गात बसण्यापासून रोखण्यात आलं. ते बहुजन असल्याचं कारण यामागे होतं. हा भेदभाव केवळ शाळेत लिहिण्या-वाचण्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांना सार्वजनिक ठिकाणचं पाणी पिण्यासही बंदी करण्यात आली होती.
advertisement
या भेदभावामुळे त्यांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या जवळ जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न समाजात सुरू झाले. यात मंदिरात जाणं, पुस्तकं वाचणं आदींचा समावेश होता. या सर्व गोष्टी त्यांच्या मनात रुजल्या आणि त्यातून उच्च-नीच भेद मिटवण्याच्या संघर्षाचा पाया रचला गेला. प्रत्येक टप्प्यावर संघर्षावर मात करून हा मुलगा पुढे देशाचा पहिला कायदेमंत्री झाला.
advertisement
मध्य प्रदेशातल्या महू या छोट्या गावात 14 एप्रिल 1891 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव भीमाबाई, तर वडिलांचं नाव रामजी मालोजी सकपाळ होतं. त्यामुळे बाबासाहेबांचं सुरुवातीचं आडनाव हे सकपाळ होतं. ते महार असल्यानं इतर वर्गातले नागरिक त्यांना खालच्या जातीतले समजत. त्यांना अस्पृश्य मानत. त्यामुळे अत्यंत कमी वयात त्यांना भेदभाव आणि सामाजिक दुराव्याचा सामना करावा लागला.
advertisement
लहानपणापासून हुशार असूनही त्यांना जातिवादी अपशब्दांना सामोरं जावं लागलं. या कारणास्तव त्यांना शाळेत दाखल करताना त्यांचे वडील रामजी यांनी त्यांचं आडनाव सकपाळ लिहिण्याऐवजी आंबवडेकर असं लिहिलं. हे आडनाव त्यांच्या मूळ गावावरून ठेवण्यात आलं होतं. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातलं आंबवडे हे त्यांचं मूळ गाव. त्यामुळे त्यांचं आडनाव आंबवडेकर असं ठेवलं. त्यानंतर त्यांचं नाव भीमराव आंबेडकर असं झालं.
advertisement
डॉ. भीमराव आंबेडकरांच्या नावापुढे आंबेडकर हे आडनाव जोडण्याची गोष्ट त्यांच्या शालेय जीवनाशी संबंधित आहे. बाबासाहेब वाचन आणि लेखनात अतिशय हुशार होते. त्यांची ही गुणवत्ता त्यांचे शाळेतले शिक्षण कृष्ण महादेव आंबेडकर यांनी विशेष आवडली. कृष्ण महादेव आंबेडकर हे ब्राह्मण होते. विशेष आपुलकीनं कृष्ण महादेव आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या नावापुढे आंबेडकर हे आडनाव जोडलं. अशा प्रकारे बाबासाहेबांचं नाव भीमराव आंबेडकर असं झालं. तेव्हापासून त्यांना आंबेडकर या नावाने संबोधलं जाऊ लागलं.


