Khatu Shyam Temple : राजस्थानला जाणे शक्य नाही; नवी मुंबईतील 'या' भव्य मंदिरात घ्या खाटू श्याम बाबांचे दर्शन

Last Updated:
khatu shyam temple mumbai : नवी मुंबईतील बेलापूर येथे असलेले श्री खाटू श्याम जी मंदिर महाराष्ट्रातील भक्तांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. चला तर तुम्ही नक्की प्लान करा या मंदिरात जाण्याचा.
1/7
 महाराष्ट्रात खाटू श्याम बाबांचे भक्त मोठ्या संख्येने आहेत. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात असलेले खाटू श्याम मंदिर अत्यंत प्रसिद्ध असले, तरी महाराष्ट्रातही भक्तांसाठी एक महत्त्वाचे मंदिर आहे.

advertisement
2/7
 नवी मुंबईतील बेलापूर येथे असलेले श्री खाटू श्याम जी मंदिर हे महाराष्ट्रातील खाटू श्याम भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते.

3/7
 खाटू श्याम यांना भगवान श्रीकृष्णाचेच एक रूप मानले जाते. त्यांचे मूळ नाव बर्बरिक होते. बर्बरिक हे घटोत्कचाचे पुत्र आणि पांडव भीमाचे नातू होते. ते अत्यंत पराक्रमी योद्धा होते.

4/7
 भगवान शिवाच्या कृपेने त्यांना तीन बाणांची अद्भुत शक्ती मिळाली होती. या तीन बाणांमुळे ते कोणतेही युद्ध एकटे जिंकू शकत होते.

5/7
 महाभारत युद्धाच्या वेळी बर्बरिक युद्धात सहभागी होण्यासाठी आले होते. मात्र भगवान श्रीकृष्णाने त्यांची परीक्षा घेतली. युद्धात सर्वात बलवान बाजूचा विजय होईल, असे बर्बरिक म्हणाल्यामुळे युद्धाचा अर्थच संपेल हे श्रीकृष्णाच्या लक्षात आले. त्यामुळे श्रीकृष्णाच्या विनंतीवरून बर्बरिकने मोठा त्याग करत आपले मस्तक अर्पण केले.

6/7
 या महान बलिदानामुळे प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना वर दिला की कलियुगात श्याम बाबा या नावाने त्यांची पूजा केली जाईल. ते भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील अशी श्रद्धा आहे

7/7
 आज नवी मुंबईतील बेलापूर येथील खाटू श्याम मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती आणि आशेचे केंद्र बनले आहे. येथे नियमित पूजा, आरती आणि विशेष उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. राजस्थानच्या खाटू श्याम मंदिराशी नाते जोडणारे हे मंदिर महाराष्ट्रातील भक्तांसाठी मोठा आधार ठरले आहे.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement