Mumbai Metro 3: आजपर्यंत मुंबईकरांनी कधीच पाहिले नसेल अशी मेट्रो, टेस्ला कार सुद्धा फेल, पहिली झलक PHOTOS

Last Updated:
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मेट्रो मार्ग ठरणार असून लाखो प्रवाशांना दळ‌णवळणाच्या उत्तमोत्तम सोयीसुविधा आणि सुलभता यामुळे मिळेल. (सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी)
1/8
राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी सरकारने कामाचा धडाका लावला आहे. अशातच आता  कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मेट्रो मार्ग ठरणार असून लाखो प्रवाशांना दळ‌णवळणाच्या उत्तमोत्तम सोयीसुविधा आणि सुलभता यामुळे मिळेल.

advertisement
2/8
पहिल्या टप्प्यात १२.४४ किमी.च्या अंतरात १० स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी ९ भूमिगत स्थानके तसेच आरे येथे एक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी ६.५ मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील प्रत्येक फेरीमध्ये २५०० प्रवासी एका वेळेला प्रवास करतील पहिल्या टप्प्यात 9 गाड्यांसह मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे. 

3/8
मुंबई मेट्रोच्या लाइन 3 चा मार्ग-आरे ते BKC हा मार्ग जे मुंबईचे प्रमुख व्यवसाय आणि कामाचे केंद्र मानले जातात. अशा नरिमन पॉइंट, कफे परेड, फोर्ट, लोअर परेल, BKC आणि SEEPZ/MIDC सारख्या भागांचा समावेश आहे. ही स्थानकं इंडिकेटर, एक्सलेटर, सीसीटीव्ही या सारख्या सुविधांनी अद्यायावत आहे. मेट्रोच्या फलाटावर लिफ्टची सोय करण्यात आलीये.

4/8
मुंबई विमानतळाला पोहचणे ह्या मार्गिकेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-2 आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-१ ह्या स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-२   ह्या स्थानकात १९ मिटर लांब भारतातील सर्वात मोठा इलेव्हेटर सरकता जिना आहे. तसंच मरोळ नाका स्थानकातून मेट्रो -३ मेट्रो-१ ला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे.

5/8
जमिनी खालून मेट्रोने प्रवास करणं सुखकर आहे पण तितकाच सुरक्षित सुद्धा आहे. प्रत्येक १ किलोमिटर स्थानक आहे. त्याचबरोबर मेट्रो ड्रायव्हरलेस असल्याने स्थानकात फायर सेफ्टी, मेट्रो  डोअर ओपनिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, इलिव्हेटर मॅनेजमेंट यासह आपत्कालिन मदत याबाबत विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

6/8
2011 मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्यांची किंमत २३ हजार कोटी होती. त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा प्रकल्प पूर्णत्वास आला.  मेट्रो कारशेडचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. २२ हेक्टर जागेवर ते साकारले आहे आणि आज मेट्रो-३ प्रकल्पाची किंमत 36 हजार कोटी झालेली आहे. आरेच्या कारशेडला झालेला विरोध त्या भोवतीच राजकारण ते मुंबईकरांचा लांबलेला भूमिगत मेट्रोचा प्रवास ह्यात मेट्रोची किंमत वाढली.

7/8
या मेट्रो 3 मुळे 4.50 लाख वाहनफेऱ्या दरदिवशी कमी होण्यास मदत होईल. तसंच 2031 पर्यंत ही संख्या साडेसहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामुळे अडीच लाख लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे 2031 पर्यंत साडेतीन लाख इंधनाची बचत होण्यात मदत होईल. तसंच दरवर्षी 10 हजार मेट्रीक टन कर्बवायुंचं प्रमाण कमी होईल. अडीचलाख टन प्रदुषित वायू प्रतीवर्षी कमी होण्यास मदत होईल. 

8/8
किती असणार स्थानकं?पहिल्या टप्प्यात १२.४४ किमी.च्या अंतरात १० स्थानके
 त्यापैकी ९ भूमिगत स्थानके तसेच आरे येथे एक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी ६.५ मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील.  ३७ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे.
किती असणार स्थानकं? पहिल्या टप्प्यात १२.४४ किमी.च्या अंतरात १० स्थानके त्यापैकी ९ भूमिगत स्थानके तसेच आरे येथे एक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी ६.५ मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील. ३७ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement