Mumbai Rain: श्रावण संपताच वारं फिरलं, कोकणात हवा बदलली, मुंबईत पाऊस की उघडीप?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: श्रावण महिना संपताच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह कोकणातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर व मुंबई परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणात थोडी उकाड्याची चाहूल लागली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे, आणि त्यातच आज 23 ऑगस्ट 2025 रोजी हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी नाही. बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस होईल, पण मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसानंतर आज हवामान शांत असेल. काही भागांत हलक्या ते मध्यम सरी येऊ शकतात, मात्र मुसळधार पावसाचा इशारा नाही. संपूर्ण कोकणात आज कोणताही अलर्ट नाही. तापमान 26 अंश सेल्सिअस ते 31 अंश सेल्सिअस पर्यंत राहील.









