Mumbai Crime : गुन्ह्याच्या ठिकाणी मिळाला तुटलेला दात; पोलिसांनी शोधून काढला अट्टल चोर, पाहा PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mumbai Crime : मुंबई उपनगरात “स्पायडर-मॅन चोर” म्हणून ओळखला जाणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. (विजय वंजारा, प्रतिनिधी)
बोरिवलीमध्ये चोरी केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना “स्पायडर-मॅन चोर” म्हणून ओळखला जाणारा चोर गंभीर जखमी झाला. चोराचे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून दोन दात तुटले असून एक पाय फ्रॅक्चर झाला. चार महिन्यांनंतर MHB कॉलनी पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळवले. चोराचे दोन तुटलेले दात गुन्ह्याच्या ठिकाणी सापडले आहेत. रोहित राठोड (वय 29) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
advertisement
नुकत्याच घडलेल्या घटनेत, त्याने 22 जून रोजी दहिसर पश्चिमेतील महात्रेवाडी येथील राजाराम तावडे रोडवरील अर्पिता अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये प्रवेश केला. एका 32 वर्षीय रहिवाशाने दरोडा टाकल्याचे लक्षात आल्याने घरातील इतर सदस्यांना सावध केले. परंतु, आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. स्वयंपाकघराच्या खिडकीतून उडी मारून तो पळून गेला.
advertisement
या घटनेचा झोन 11 चे डीसीपी अजयकुमार बन्सल आणि वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सूर्यकांत पवार आणि पीएसआय अखिलेश भोंबे यांच्या पथकाने तपास सुरू केला. इमारतीच्या आवारात दोन तुटलेले दात आणि रक्ताचे डाग आढळून आले. सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला असता, आरोपी इमारतीवरून पडताना दिसला. ज्यामुळे तो जखमी झाला. त्याचा दात तुटून जमिनीवर पडला आणि त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे तो थोड्या काळासाठी वेदनेत राहिला, शेवटी स्वत:ला कंपाऊंड भिंतीजवळ ओढून, त्यावर उडी मारून पळून गेला.
advertisement
advertisement
पोलिसांनी पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला त्याचा शोध घेण्यासाठी दररोज शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची जबाबदारी सोपवली. गेल्या आठवड्यात, कॉन्स्टेबलने त्याला वाकोला येथील रुग्णालयात शोधून काढले जेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि डिस्चार्ज झाल्यानंतर घरी परतताच त्याला अटक करण्यात आली.
advertisement