Traffic Jam in Mumbai: मुंबईकरांनो जपून! लाँग विकेंड संपला अन् रस्ते जाम झाले; ऑफिसला पोहोचायला २ तासांहून अधिक वेळ लागणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Traffic Jam in Mumbai: सलगच्या सुट्ट्या संपल्या आहेत. आता पुन्हा ऑफिसची लगबग सुरू झाली आहे. शाळा कॉलेज देखील सुरू झाले आहेत. नव्या वर्षात वर्क फ्रॉम होम करणारे देखील आज पहिल्यांदा ऑफिसला जात आहेत.
सलगच्या सुट्ट्या संपल्या आहेत. आता पुन्हा ऑफिसची लगबग सुरू झाली आहे. शाळा कॉलेज देखील सुरू झाले आहेत. नव्या वर्षात वर्क फ्रॉम होम करणारे देखील आज पहिल्यांदा ऑफिसला जात आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना आज करावा लागत आहे. लोकल ट्रेनमध्ये गर्दी आहेच पण त्याच सोबत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
advertisement
मिरा रोड ते BKC ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना दीड तासापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. सलगच्या सुट्ट्या, इयएन्ड आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या सुट्ट्यांमुळे लाँग विकेण्डला आला होता. त्यामुळे लोक फिरायला बाहेर पडले होते. आता पुन्हा कामावर रूजू होण्यासाठी निघालेल्यांना आता ट्रॅफिकचा सामना करावा लागणार आहे.
advertisement
advertisement
मिरा रोड ते करी रो़ड जर तुम्ही प्रवास करणार असाल तर जरा सांभाळूनच याचं कारण म्हणजे जवळपास 20 ते 30 मिनिटांचा भलामोठा ट्रॅफिक जाम आहे. त्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होऊ शकतो. तुम्ही एक ते दीड तास आधीच प्लॅन करून निघा. हे अंतर गाठायला जवळपास २ तास ५ मिनिटं ते २ तास १५ मिनिटं देखील कमीत कमी लागू शकतात.
advertisement











