Mumbai Rain: कोकणात पावसाचं धुमशान, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती.आज, 21 जुलै रोजी, या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात जाणवू शकतो. मात्र काही भागात पावसाची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे हवामान अधिक दमट आणि उष्ण झाले आहे. बहुतांश भागांत रिमझिम स्वरूपात हलक्या सरी पडत असल्या तरी, ऊन आणि उकाडा यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
advertisement
मुंबई शहरासह उपनगरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, दुपारी पावसाचा जोर वाढेल. हवामान दमट असल्याने उष्णता अधिक जाणवत आहे. मुंबईत आजचे कमाल तापमान अंदाजे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 26 अंश सेल्सिअस राहील. आज हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
ठाणे व नवी मुंबई परिसरात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला होता. आज पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागांत रिमझिम सरी सुरु आहेत. येथील कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आहे आणि किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
advertisement
कोकणच्या किनारपट्टीवर मागील दोन दिवसांत जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आज पुन्हा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आज ढगाळ वातावरण असून जोरदार पावसाची शक्यता आहे. समुद्रकिनारी दमटता अधिक असून, कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. मच्छिमारांनी समुद्राकडे जाताना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.