अभिनेत्याने सासूलाच बनवलं बायको, लग्नानंतर झालं जगणं मुश्किल, आता असं जगतायत जीवन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
South Actor Love Story : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अशी अनेक जोडपी आहेत जी वर्षानुवर्षे एकमेकांसोबत प्रेमसंबंध टिकवून आहेत.
प्रेमाला वय, रंगरूप आणि परिस्थितीचं बंधन नसतं. प्रेम कधी, कुठे आणि कशामुळे होईल हे सांगता येत नाही. वाढत्या वयामुळे प्रेम कमी होत नाही, उलट ते अधिक गडद होत जातं. अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी हे सिद्ध केलं आहे की प्रेमाला कोणत्याही नियमांचा अडसर लागत नाही. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अशी अनेक जोडपी आहेत जी वर्षानुवर्षे एकमेकांसोबत प्रेमसंबंध टिकवून आहेत.
advertisement
असंच एक लोकप्रिय टीव्ही कपल म्हणजे इंद्रनील वर्मा आणि मेघना रामी. या जोडप्याने नुकतीच त्यांच्या २०व्या लग्नाच्या वाढदिवसाचे शानदार सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे, या दोघांनी एका प्रसिद्ध तेलुगू टीव्ही शो ‘चक्रवगम’ मध्ये एकत्र काम केलं आहे. या शोमध्ये मेघनाने इंद्रनीलच्या सासूची भूमिका साकारली होती, मात्र प्रत्यक्ष आयुष्यात ते नवरा-बायको बनले.
advertisement
जेव्हा इंद्रनील आणि मेघना लग्नाच्या बंधनात अडकणार होते, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. कारण टीव्ही मालिकेत मेघनाने इंद्रनीलच्या सासूची भूमिका साकारली होती आणि वास्तविक आयुष्यात ते जोडीदार बनणार होते. मात्र, प्रेमाच्या मार्गात अडथळे येतातच, पण या दोघांनी कोणत्याही टीकेची पर्वा न करता एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आजही हे जोडपं एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
advertisement
advertisement
परंतु मेघना रामी यांनी एक वेळ अशी अनुभवी जेव्हा त्यांना मोठ्या दुःखातून जावं लागलं. एका शूटिंगदरम्यान त्यांचा गर्भपात झाला आणि त्यामुळे त्या तब्बल ६ वर्षं डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्या त्यावेळी त्यांच्या करिअरच्या शिखरावर होत्या, त्यामुळे ही घटना त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. या कठीण काळात इंद्रनील वर्मा यांनी त्यांना पूर्ण साथ दिली आणि त्यांना यातून बाहेर येण्यास मदत केली.
advertisement
या संपूर्ण अनुभवातून बाहेर पडताना इंद्रनील आणि मेघनाने मिळून एक एनजीओ सुरू केला. मुलं दत्तक घेण्याचा विचारही त्यांनी केला होता, पण नंतर त्यांना जाणवलं की त्यांचं प्रेम एका मुलापुरतं मर्यादित न ठेवता, त्यांनी संपूर्ण समाजासाठी काहीतरी करायला हवं. त्यामुळे त्यांनी समाजसेवेचा मार्ग स्वीकारला आणि गरजू लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
advertisement







