Dahihandi 2025: गल्लीबोळात घुमतो गोविंदाचा गजर, दादरमधील 5 लोकप्रिय दहीहंडी एका क्लिकवर

Last Updated:
Dahihandi 2025: दहीहंडी आणि मुंबई हे समीकरण जगप्रसिद्ध आहे. विशेषत: दादर परिसरातील दहीहंडी प्रचंड लोकप्रिय आहेत. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेला दादर परिसर राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या अग्रणी आहे. गणेशोत्सव असो किंवा दहीहंडी दादरमधील गल्लीबोळांमधील सणांचे रूप नेहमीच थक्क करणारे असते. यंदाच्या वर्षी जर तुम्ही दहीहंडीचा आनंद घ्यायचा विचार करत असाल तर दादरमधील या 5 ठिकाणी नक्की भेट द्या.
1/5
शिवसेना भवन गल्ली - राजकारण आणि शक्तीप्रदर्शनदहीहंडीच्या दिवशी शिवसेना भवनाच्या गल्लीत असलेला जल्लोष अनुभवणं म्हणजे मुंबईच्या जोशाचा साक्षीदार होणं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ढोलताशांचा गजरात भगव्या पताकांनी सजलेली हंडी एकजुटीचं आणि परंपरेचं प्रतीक असते. अनेक नामवंत व्यक्ती या उत्सवात सहभागी होतात.
शिवसेना भवन गल्ली - दहीहंडीच्या दिवशी शिवसेना भवनाच्या गल्लीत असलेला जल्लोष अनुभवणं म्हणजे मुंबईच्या जोशाचा साक्षीदार होणं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ढोलताशांचा गजरात भगव्या पताकांनी सजलेली हंडी एकजुटीचं आणि परंपरेचं प्रतीक असते. अनेक नामवंत व्यक्ती या उत्सवात सहभागी होतात.
advertisement
2/5
कबुतरखाना - दादर पश्चिमेतील कबुतरखान्याजवळची हंडी नेहमीच गर्दी खेचते. या चौकात लावलेली उंच हंडी, गगनचुंबी थर रचणारे गोविंदा पथक आणि जोरदार जल्लोष यामुळे संपूर्ण परिसरात स्फूर्तीचं वातावरण निर्माण होतं. येथील हंडी फोडण्यासाठी बक्षिसांची लयलूट केली जाते.
कबुतरखाना - दादर पश्चिमेतील कबुतरखान्याजवळची हंडी नेहमीच गर्दी खेचते. या चौकात लावलेली उंच हंडी, गगनचुंबी थर रचणारे गोविंदा पथक आणि जोरदार जल्लोष यामुळे संपूर्ण परिसरात स्फूर्तीचं वातावरण निर्माण होतं. येथील हंडी फोडण्यासाठी बक्षिसांची लयलूट केली जाते.
advertisement
3/5
खांडके बिल्डिंग - परंपरेची ध्वजवाहक हंडीदादर पूर्वमधील ही हंडी जुन्या आणि नव्या पिढीचा संगम आहे. खांडके बिल्डिंगसमोर दरवर्षी उभारली जाणारी हंडीमध्ये स्थानिक रहिवासी जोमाने भाग घेतात. येथे गोविंदा पथकांसोबतच शाळाकरी मुलं आणि कुटुंबंही मोठ्या संख्येने सहभागी होतात. थर लावण्याआधी पारंपरिक फुगडी, लेझीम आणि दांडियाचं सादरीकरण होतं.
खांडके बिल्डिंग - दादर पूर्वमधील ही हंडी जुन्या आणि नव्या पिढीचा संगम आहे. खांडके बिल्डिंगसमोर दरवर्षी उभारली जाणारी हंडीमध्ये स्थानिक रहिवासी जोमाने भाग घेतात. येथे गोविंदा पथकांसोबतच शाळाकरी मुलं आणि कुटुंबंही मोठ्या संख्येने सहभागी होतात. थर लावण्याआधी पारंपरिक फुगडी, लेझीम आणि दांडियाचं सादरीकरण होतं.
advertisement
4/5
आयडियल गल्ली - लेडीज स्पेशल हंडीचा जलवाया गल्लीतली हंडी 'लेडीज स्पेशल' टीम्सची खास ओळख ठरते. महिलांच्या पथकांनी उभारलेले थर, साड्यांमध्ये झळकणारी जिद्द आणि जोश, यामुळे ही हंडी वेगळी ठरते. विविध महिला मंडळं आणि सामाजिक संस्था यामध्ये भाग घेतात. ही दहीहंडी फक्त सण म्हणून नाही तर महिला सक्षमीकरणाचा संदेश देते.
आयडियल गल्ली - या गल्लीतली हंडी 'लेडीज स्पेशल' टीम्सची खास ओळख ठरते. महिलांच्या पथकांनी उभारलेले थर, साड्यांमध्ये झळकणारी जिद्द आणि जोश, यामुळे ही हंडी वेगळी ठरते. विविध महिला मंडळं आणि सामाजिक संस्था यामध्ये भाग घेतात. ही दहीहंडी फक्त सण म्हणून नाही तर महिला सक्षमीकरणाचा संदेश देते.
advertisement
5/5
सुविधा गल्ली - उंच झळकणारी लोकप्रिय हंडीही दहीहंडी दरवर्षी मीडिया कव्हरेजमध्ये झळकते. या दहीहंडीमध्ये मुंबईतील नामवंत गोविंदा पथकं सहभागी होतात. दहीहंडीची उंची, थरांची अचूकता आणि आकर्षक बक्षिसं यामुळे ही हंडी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करते. सोशल मीडियावर लाईव्ह कव्हरेज, डीजेचा धमाका आणि स्टेज शोमुळे ही दहीहंडी विशेष लोकप्रिय आहे.
सुविधा गल्ली - ही दहीहंडी दरवर्षी मीडिया कव्हरेजमध्ये झळकते. या दहीहंडीमध्ये मुंबईतील नामवंत गोविंदा पथकं सहभागी होतात. दहीहंडीची उंची, थरांची अचूकता आणि आकर्षक बक्षिसं यामुळे ही हंडी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करते. सोशल मीडियावर लाईव्ह कव्हरेज, डीजेचा धमाका आणि स्टेज शोमुळे ही दहीहंडी विशेष लोकप्रिय आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement