आजचं हवामान: राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट, या 9 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील 24 तासांतील तापमान आणि हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
आज दिनांक 14 एप्रिल मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम आहे. रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी 42.6 अंश तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान झाल्याने, तसेच जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.
advertisement
advertisement
आज पुण्यातील कमाल तापमान 38 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहिल. दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूरातील वातावरणात उष्मा कमालीचा जाणवत असून येथील कमाल तापमान 36 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. ढगाळ वातावरण पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गडगडाटी वादळाच्या शक्यतेसह दक्षतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहिल. तसेच आकाश ढगाळ राहून मध्यम ते गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 असेल इतके राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच अंशतः ढगाळ आकाशासह एक- दोन वेळा गडगडाटी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
आज मध्य महाराष्ट्रतील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.