Weather Alert : महाराष्ट्रात गुरुवारी वादळी पाऊस कोसळणार, 20 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
23 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील वातावरणात सतत बदल जाणवत आहे. गेले काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाने उघडीप दिली. तर काही भागांत हलक्या सरी बरसल्याचे दिसून आले. 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
कोकण विभागातील पालघरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









