Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे! महाराष्ट्रावर हिम लाटेचं सावट, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढताना दिसत असून पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार कायम राहणार आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर अधिक जाणवत असून उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
1/7
राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढताना दिसत असून पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार कायम राहणार आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर अधिक जाणवत असून उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोकण विभागात इतर भागांच्या तुलनेत तापमान जास्त असल्याचं दिसून येतं आहे. 10 जानेवारी रोजीही राज्याच्या बहुतांश भागांत थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.

advertisement
2/7
कोकण विभागात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं राहील. सकाळी आणि रात्री गारवा जाणवेल, मात्र दिवसभर हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.

3/7
.पश्चिम महाराष्ट्रात पहाटेच्या वेळेत थंडीचा अनुभव येणार आहे. पुणे शहरात सकाळच्या वेळेत दाट धुके पडण्याची शक्यता असून दिवसभर सुद्धा धुकं राहू शकतं. येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

4/7
मराठवाडा विभागात सकाळी थंड वातावरण राहील, त्यानंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहणार आहे. मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांत काहीशी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र असून पहाटे गारठा जाणवेल. तसेच दिवसभर सुद्धा हुडहुडी कायम राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. काही भागांत सकाळी धुक्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

6/7
विदर्भात थंडीचा जोर कायम आहे. नागपूर येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. सकाळच्या वेळेत जास्त गारवा जाणवेल आणि दिवसभर सुद्धा हुडहुडी जाणवण्याची शक्यता आहे. तसेच आकाश मुख्यतः निरभ्र राहील. काही जिल्ह्यांत किमान तापमान 10 अंशांच्या आसपास घसरल्याने गारठा वाढल्याचं चित्र आहे.

7/7
राज्यभरात पहाटे धुके, दव आणि थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव वाढलेला आहे. तापमानातील सततच्या चढ-उतारामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरणे आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement