Weather Alert: बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजेही येणार, मुसळधार कोसळणार, 11 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यातील एकूण तीन जिल्हे आणि नाशिकच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट तर सहा जिल्हे आणि पुण्याच्या घाट भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. पाहुयात 6 सप्टेंबरला राज्यात हवामान कसं असेल.

advertisement
2/7
राज्यातील एकूण तीन जिल्हे आणि नाशिकच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट तर सहा जिल्हे आणि पुण्याच्या घाट भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील एकूण तीन जिल्हे आणि नाशिकच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट तर सहा जिल्हे आणि पुण्याच्या घाट भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

4/7
पुण्याच्या घाट परिसरात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुणे शहर आणि परिसरात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील. 5 आणि 6 तारखेला नाशिकचा घाट भाग, नंदुरबार, धुळे येथे मुसळधार तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

6/7
येणाऱ्या 24 तासात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

7/7
विदर्भात मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. विदर्भातील बहुतांश भागात सामान्यतः ढगाळ वातावरण राहील. तर काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement