Weather Alert: राज्यात पुढील 24 तास जोरदार पावसाचे, 15 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
राज्याच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
1/7
राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

advertisement
2/7
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागवार संपूर्ण राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल? पाहुयात.

3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मुंबईमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

4/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, साताऱ्याबरोबरच हवामान विभागाने सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील यलो अलर्ट जारी केला आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो.

6/7
तर मराठवाड्यात देखील पावसाचे पुन्हा एकदा पुनरागमन होणार असून छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने शुक्रवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाड्यातील उर्वरित जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

7/7
 तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली तर पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement