Zomato-Swiggyची घोषणा! गिग वर्कर्सला वेतन वाढ, पाहा एका ऑर्डरचे किती मिळणार

Last Updated:

देशभरात सुरू असलेल्या गिग कामगारांच्या संपादरम्यान, झोमॅटो आणि स्विगीने त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी पेमेंट आणि इन्सेंटिव्हमध्ये वाढ केली आहे. कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ही एक सामान्य पद्धत असल्याचे म्हटलेय.

गिग वर्कर्स
गिग वर्कर्स
नवी दिल्ली : देशभरातील गिग कामगार संघटनांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संप पुकारण्याची घोषणा केली होती. मात्र आता या संपाच्या पार्श्वभूमीवर झोमॅटो आणि स्विगी यांनी त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी पेमेंट आणि इन्सेंटिव्हमध्ये वाढ केली आहे. वर्षातील सर्वात व्यस्त दिवशी सर्व्हिसमध्ये व्यत्यय टाळण्यासाठी कंपन्यांनी हे सणासुदीच्या काळात एक सामान्य पद्धत असल्याचे म्हटले आहे.
देशभरात डिलिव्हरी भागीदारांचे निषेध
TGPWU आणि IFAT चा दावा आहे की 1.7 लाखांहून अधिक डिलिव्हरी कामगारांनी संपात सहभागी झाल्याची पुष्टी केली आहे. संघटनांच्या मते, कमी होत जाणारे उत्पन्न, सुरक्षिततेचे धोके आणि कठोर कामाच्या परिस्थितीमुळे देशभरात निदर्शने केली जात आहेत.
झोमॅटोने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 6 ते 12 वाजेपर्यंतच्या पीक अवर्समध्ये डिलिव्हरी पार्टनर्सना प्रति ऑर्डर 120 ते 150 रुपये पेमेंट ऑफर केले आहे.  प्लॅटफॉर्मने ऑर्डरची संख्या आणि कामगार उपलब्धतेनुसार दिवसभरात 3,000 रुपयांपर्यंत कमाईचे आश्वासन दिले आहे.
advertisement
झोमॅटोने ऑर्डर नाकारणे आणि रद्द करणे यासाठी लागणारा दंड तात्पुरता माफ केलाय. झोमॅटोची मूळ कंपनी, एटरनलच्या प्रवक्त्याने पीटीआयच्या वृत्तात स्पष्ट केले की, हा उच्च-मागणी असलेल्या सणांमध्ये आणि वर्षाच्या अखेरीस पाळला जाणारा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल आहे.
advertisement
स्विगीने इन्सेटिव्हमध्ये केली वाढ 
झोमॅटोप्रमाणेच, स्विगीनेही वर्षाच्या अखेरीस प्रोत्साहने वाढवली आहेत. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान डिलिव्हरी कामगारांना 10,000 रुपयांपर्यंतच्या कमाईची ऑफर दिली आहे, असे या डेव्हलपमेटशी परिचित असलेल्या लोकांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, प्लॅटफॉर्म संध्याकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत सहा तासांच्या कालावधीसाठी पीक-अवरमध्ये 2,000 रुपयांपर्यंतची कमाई वाढवत आहे जेणेकरून वर्षातील सर्वात व्यस्त ऑर्डरिंग वेळेपैकी एकामध्ये मोठ्या संख्येने रायडर्स उपलब्ध असतील.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Zomato-Swiggyची घोषणा! गिग वर्कर्सला वेतन वाढ, पाहा एका ऑर्डरचे किती मिळणार
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement