Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे, राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता, 9 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे. पाहुयात 4 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
मागील काही दिवसांपासून राज्यामधून पावसाने काढता पाय घेतला आहे. परंतु, पुढील 24 तासांसाठी पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे. पाहुयात 4 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

advertisement
2/7
4 ऑगस्ट रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. त्याचबरोबर कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये श्रावण सरींनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागावर देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून सोलापूरमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

5/7
तर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. धाराशिव, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

6/7
त्याचबरोबर बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो. जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

7/7
पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे पाच जिल्हे आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे हलका पाऊस होऊ शकतो.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement