Weather Alert: राज्यात मंगळवारी या ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळणार, 20 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

Last Updated:
Weather Alert: कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पाहुयात 24 जून रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
राज्यात मागील काही दिवसांपासून कोकण किनारपट्टी तसेच विदर्भामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

advertisement
2/7
परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पाहुयात 24 जून रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

4/7
ठाणे, पालघर, जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

5/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून नाशिक, अहिल्यानगर आणि नंदुरबारमध्येही काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

6/7
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.

7/7
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement