Weather Alert: वारं फिरलं! महाराष्ट्रावर शुक्रवारी दुहेरी संकट, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
17 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात मात्र कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
1/7
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तापमानात किंचित वाढ होत असून अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 17 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात मात्र कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. पाहुयात, 17 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement
2/7
मुंबईत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

3/7
पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच घाटमाथा परिसरात देखील विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

6/7
विदर्भातील नागपूरमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहण्याची असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.

7/7
राज्यातील काही भागांत पावसाचे सत्र सुरू राहण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात कोरडे हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तसेच तापमानात वाढ होत असल्याने उकाड्याची तीव्रता थोडी वाढण्याची शक्यता आहे.‎
राज्यातील काही भागांत पावसाचे सत्र सुरू राहण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात कोरडे हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तसेच तापमानात वाढ होत असल्याने उकाड्याची तीव्रता थोडी वाढण्याची शक्यता आहे. ‎
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement