Weather Alert: धो धो कोसळणार! पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट, कोल्हापुरात काय स्थिती?

Last Updated:
Weather Forecast: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर कायम आहे. पुढील 24 तासांसाठी सातारा, पुण्याच्या काही भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1/7
राज्यात मान्सूनचा जोर कायम असून कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार पाऊश सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. आज 28 जून रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात 0.4 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर घाटभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील तापमान 29 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे.

3/7
कोल्हापूर परिसरात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसाने धरणांची पाणीपातळी वाढत आहेत. पुढील 24 तासात कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट कायम आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस राहिल.

4/7
मागील 24 तासात सातारा शहरात 6 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. आज ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान 27.8 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहील.

5/7
सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा 33.3 अंशापर्यंत वाढला. मागील 24 तासात पावसाची पूर्णपणेच उघडीप राहिली. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता असून यावेळी तापमानाचा पारा 32 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील बहुतांश परिसरास पावसाने उघडीप दिली आहे. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 29 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.

7/7
दरम्यान, घाट भाग वगळता पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतलीये. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. घाट भागात मात्र पावसाचा जोर कायम आहे. पुढील काही काळ हीच स्थिती राहणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement