advertisement

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, गौरी-गणपती विसर्जनाला धो धो पाऊस, 3 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
1/5
महाराष्ट्रात चक्रीय परिस्थितीमुळे सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. आज राज्यातील 28 जिल्ह्यांना यलो तर 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुणे ते कोल्हापूर घाटभागात जोरदार पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबरचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊ

2/5
पुण्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज पुन्हा एकदा पुण्यातील घाट भागाला यलो अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. उर्वरित पुण्यात आज मध्यम पावसाची शक्यता असून उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे.

3/5
सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 4 दिवस या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे

4/5
कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर कायम आहे. पुढील 24 तासांसाठी घाटमाथा भागात यलो अलर्ट देण्यात आला असून विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यात कोणताही विशेष अलर्ट नाही. मात्र, काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.

5/5
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये कोणताही विशेष अलर्ट नाही. येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement