Laxmi-Ganesha Pujan: लक्ष्मी पूजेसाठी पाट-चौरंग या दिशेला मांडावा; पहा अचूक मुहूर्त-विधी-महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Diwali Vastu Tips Marathi: दिवाळीचा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात हा उत्सव सलग 5 दिवस साजरा केला. त्याची सुरुवात वसुबार, धनत्रयोदशीपासून होते. यावेळी 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीचा सण आहे.
advertisement
पूजन करताना अनेक लोक लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती कोणत्याही दिशेला ठेवतात, तसं करणं चुकीचे आहे. असे केल्याने कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दिवाळी पूजेच्या वेळी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती कोणत्या दिशेला ठेवाव्यात? लक्ष्मी-गणेशाच्या पूजेसाठी पाट-चौरंग कोणत्या दिशेला ठेवावे? दिवाळीत पूजेचे नियम, याविषयी ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ राकेश चतुर्वेदी यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
पूजेचा पाट-चौरंग या दिशेला मांडावा-ज्योतिष तज्ज्ञांच्या मते दिवाळी पूजेदरम्यान दिशांची विशेष काळजी घ्यावी. आपण चुकीची दिशा निवडल्याने पूजकाला शुभ परिणामांपासून वंचित राहाव लागू शकते. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे उत्तम मानले जाते. असे करणाऱ्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. घरात पैशाची कमतरता राहत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
दिवाळी तिथी आणि शुभ मुहूर्त -ज्योतिषांच्या मते, दिवाळी हा सण आश्विन महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 03:12 पासून सुरू होईल आणि 01 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05.53 पर्यंत चालेल. दिवाळीच्या सणात उदयतिथी नव्हे तर प्रदोषकाळ मानला जातो. प्रदोष काळ 31 ऑक्टोबरला उपलब्ध आहे. लक्ष्मीपूजन शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 नंतर सुरू करावे. सायंकाळी 06 पासून शुभ मुहूर्त आहेत.
advertisement
advertisement
पूजेसाठी अशी मूर्ती निवडा -ज्योतिषी सांगतात की, पूजेच्या वेळी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती स्वच्छ चांगली असावी, कोठूनही खंडित (फुटले-तुटलेली) झालेली असू नये. लक्ष्मीची मूर्ती आशीर्वाद मुद्रेत असावी. वास्तुशास्त्रानुसार अशी गणपतीची मूर्ती निवडा, ज्यामध्ये त्याची सोंड डावीकडे वळलेली असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







