Ganeshotsav 2025: बाप्पा मोरया! भक्तीच्या वर्षावात तासगावचा रथोत्सव, काय आहे 246 वर्षांची परंपरा?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Ganeshotsav 2025: पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक व सीमाभागातही तासगावचा रथोत्सव सुप्रसिद्ध आहे. गणपतीच्या रथोत्सवाला 246 वर्षांची परंपरा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात जागृत गणपती म्हणून तासगावचा उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक प्रसिद्ध आहे. सुंदर हेमाडपंथी मंदिर आणि लोकोत्साही परंपरेने समृद्ध असलेला गणपती रथोत्सव तासगावकरांच्या श्रद्धेचा विषय आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक व सीमाप्रांतातही हा रथोत्सव सुप्रसिद्ध आहे. यंदाही लाखो भाविक या रथोत्सवासाठी एकत्र आले. श्रद्धेने आणि तितक्याच जल्लोषात लोकांनी 246 वा रथोत्सव साजरा केला.
advertisement
advertisement
advertisement
या रथामध्ये संस्थानची पंचधातूची सिद्धिविनायकाची मूर्ती असते. श्रींचा रथ गुरूवार पेठेतील काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत ओढतात. मिती भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी दुपारी रथोत्सवास सुरुवात होते. या रथासमोर गणपती संस्थानचा हत्ती दिमाखात चालत असतो. पालखी, गुलाल, पेढे, खोबर्याची उधळण, मंगलमूर्तींचा जयघोष, झांजपथक यामुळे वातावरण भक्तिमय असते.
advertisement
रथोत्सवात तरुण पिढी मानवी मनोरे उभारुन आनंद लुटते. ढोल, लेझिम पथके रथासमोर भक्तीभावाने आपले सादरीकरण करत असतात. काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ आल्यानंतर त्या ठिकाणी गणपतीची आरती केली जाते. यानंतर रथ पुन्हा गणपती मंदिराकडे परतीच्या प्रवासास निघतो. रथ परत गणपतीच्या मंदिरापर्यंत ओढला जातो व रथोत्सव संपतो.
advertisement
advertisement
तासगावच्या या रथोत्सव मिरवणुकीसाठी पूर्वी जो रथ वापरला जायचा. तो संपूर्ण लाकडी, सुंदर, नक्षीदार असा होता. आता लोखंडी बनवलेल्या व केळीच्या पानांनी सजवलेल्या रथातून श्रींची मिरवणूक काढली जाते. या रथास मोठमोठे दोरखंड बांधून पूर्ण मिरवणूक होइपर्यंत हा रथ ओढला जातो. या उत्सवावेळी आबालवृद्धांकडून मोठ्या श्रध्देने गणेशाचा जयजयकार करतात.