Gudi Padwa 2025: सलग सुट्ट्यात आहेत, गोदाकाठचा प्लॅन करा, नाशिकमध्ये साजरा होतोय अनोखा गुढीपाडवा

Last Updated:
Gudi Padwa Nashik: संपूर्ण भारतभरात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा दक्षिण काशी नाशिकमध्ये गोदाकाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
1/7
गुढीपाडव्याला संपूर्ण भारतभरात हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. तसेच गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी हिंदू धर्मस्थळांवर खास पूजा-अर्चा केल्या जातात. यंदा रविवार, दि. 30 मार्च रोजी सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा होणार आहे.

advertisement
2/7
दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये देखील नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि महापालिकेतर्फे नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीये. गुरुवार, दि. 27 मार्चे त रविवारी, 30 मार्चदरम्यान गोदाकाठावर महारांगोळी, महावादन, नववर्ष स्वागत यात्रा यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

3/7
भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने गुणगौरव न्यास संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे एक आठवडा आधीपासूनच संस्कृती जपणारे विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात.

4/7
हिंदू नववर्षाचे समितीच्या वतीने गोदाकाठावरील पाडवा पटांगणावर ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभायात्रांच्या जल्लोषात स्वागत दरवर्षी करण्यात येत असतं. यंदादेखील समितीने ही परंपरा कायम राखली आहे. नाशिककरांनी नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

5/7
यंदा 1500 पेक्षा जास्त शास्त्रीय विद्यार्थी गायन, नृत्य, वादन यावेळी सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी 6.30 वाजता अश्विननगर येथील छत्रपती संभाजी क्रीडा संकुलात एक हजार ढोलांचे समूह वादन होणार आहे. तर गोदातीरावरील पाडवा पटांगणात कीर्तनकार प्रेरणा बेळे यांचे कीर्तन होईल.

6/7
गुरुवार (दि. 27) रोजी सायंकाळी 6.30 वाजता 'अंतर्नाद' शास्त्रीय गायन, वादन, नृत्य कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शुक्रवार (दि. 28) रोजी सकाळी 7 वाजल्यापासून अहिल्यादेवी होळकर यांना समर्पित 20 हजार चौरस फुटांची महारांगोळी प्रदर्शन असेल.

7/7
शनिवार (दि. 29) रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि शस्त्र कलांचे सादरीकरण केले जाणार आहे. तर रविवार, दि. 30 रोजी गुढीपाडवा निमित्त सकाळी 7 वाजता शोभायात्रा निघणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलंय.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement