Nag Panchami 2024: जीवनात पुन्हा येईल आनंद! नागपंचमीच्या दिवशी या उपायांनी कायमचा घालवा कालसर्प दोष
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Marathi Nag Panchami 2024: हिंदू धर्मात अनेक महत्त्वाचे सण उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक सणाचं खास असं महत्त्व आहे. नागपंचमी हा त्यापैकीच एक सण होय. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या पंचमीला हा सण साजरा होतो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. तसंच काही व्यक्ती या दिवशी उपवास देखील करतात. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू-केतूचे दोष किंवा कालसर्प योग आहे, त्यांनी या दिवशी काही खास उपाय केल्यास हा दोष कमी होऊ शकतो. या उपायांविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कालसर्प दोष दूर व्हावा यासाठी नागपंचमीला शिवमंदिरात जावं. तिथं साफसफाई करावी. दुरुस्तीचं काही काम असेल तर ते करावं. यामुळे कालसर्प दोष कमी होतो आणि भगवान शंकराची कृपादृष्टी लाभते. तसंच नागपंचमीला साप किंवा नागाशी संबंधित वस्तूंचं दान करावं. तसंच गरीब, गरजूंना अन्न किंवा वस्त्रदान करावं. यामुळेदेखील कालसर्प दोष नाहीसा होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


