शुभ फळ प्राप्तीसाठी जपमाळांचा जप करताना कोणते नियम पाळावेत? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी माळ जप केला जातो.
दैनंदिन जीवनात देवाची पूजा करत असताना हिंदू धर्मात माळ देखील जपली जाते. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी माळ जप केला जातो. मात्र, शुभ फळ प्राप्तीसाठी हा जपमाळांचा जप करताना काही नियम पाळावे लागतात. याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जपमाळाने जप करताना काही चुका अजिबात करू नका. यामध्ये गळ्यात जपमाळ घालू नका. पूजा केल्यानंतर मंदिरात आदराने ठेवा. दुसऱ्याच्या जपमाळाने कधीही मंत्राचा जप करू नका. मंत्राचा उच्चार करताना कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात आणू नका, असे केल्याने मंत्राचे परिणाम नष्ट होऊ शकतात, असे हेमंतशास्त्री सांगतात.
advertisement
advertisement