advertisement

Angarki Sankashti 2024: अंगारकी संकष्टीची पूजा कशी करावी? गणेश पूजेसाठी दुपारी 1 तासाचा मुहूर्त चुकवू नका

Last Updated:
Angarki Sankashti 2024 : ज्येष्ठ महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अंगारकीला व्रत-उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते. त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल, त्यामुळे उपवास करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊ अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कधी आहे? त्या दिवशी गणेश पूजनाची वेळ कोणती? चंद्र अर्घ्याची वेळ आणि चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व काय?
1/7
अंगारकी संकष्टी चतुर्थी 2024 कधी आहे?वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार, 25 जून रोजी पहाटे 01:23 पासून सुरू होईल. ही तिथी 25 जून रोजी रात्री 11:10 वाजता संपेल. उदयतिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत 25 जून रोजी पाळण्यात येणार आहे.

2/7
संकष्टी चतुर्थी 2024 मुहूर्त -संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी 02.32 पर्यंत श्रवण नक्षत्र आहे. त्या दिवशी ब्रह्म मुहूर्त 04:05 AM ते 04:45 AM पर्यंत असेल आणि पूजेसाठी शुभ अभिजीत मुहूर्त सकाळी 11:56 ते दुपारी 12:52 पर्यंत आहे.

3/7
अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधीवत पूजा केल्यास फलदायी ठरते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं. पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करुन व्रताचा संकल्प करावा. श्री गणेशाला प्रार्थना करावी. पूजा करते वेळी लाल वस्त्र परिधान करावं. श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्यानं आणि नंतर पंचामृतानं म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखरेच्या मिश्रणानं स्नान घालावं. त्यानंतर पुन्हा पाण्यानं स्नान घालावं. गणेश चालिसा, गणपती स्तोत्र, गणपती अर्थवशीर्ष किंवा मंत्र म्हणावेत. श्री गणेशाला वस्त्र घालावं.

4/7
त्यानंतर मूर्तीला शेंदूर, चंदन, दूर्वा, फुलं किंवा हार घालावा. धूप लावावा. त्यानंतर श्री गणेशाला मोदक, मिठाई, गूळ आणि फळांचा नैवेद्य दाखवा. नारळ आणि दक्षिणा द्यावी. कुटुंबियांसोबत श्री गणेशाची आरती करावी. त्यानंतर हातात फुलं घेऊन पुष्पांजली अर्पण करावी. शक्य असल्यास गणेशाच्या मूर्तीला एकच प्रदक्षिणा घालावी. यानंतर कुटुंबीयांसमवेत श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करावा. या दिवशी श्री गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये.

5/7
अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा. फलाहार, पाणी, दूध किंवा फळांचा रस घ्यावा. व्रतानुसार सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं. तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावं, गायीला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा. शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगी द्यावी. सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करुन संकष्टी व्रत कथेचं पठण करावं. सायंकाळी पूजेवळी श्री गणेशाला चंदनाचं गंध लावावं आणि मोदक किंवा मोतीचूर लाडूंचा नैवद्य दाखवावा. चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकी चतुर्थी व्रत सोडावं.

6/7
हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे. हनुमानाचीही पूजा फलदायी अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीसोबतच श्री हनुमानाची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी व्यक्तीने शेंदूरचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातली सर्व विघ्नं, संकटं दूर होतात आणि त्याला सुख-समृद्धी प्राप्त होते.

7/7
श्री गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात. तो बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता आहे. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचं व्रतदेखील केलं जातं. अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फल मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात, असं जाणकार सांगतात. अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तकं आणि चार हातांच्या स्वरुपात असतो. श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक मानलं जातं. ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत, यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल, असा आशीर्वाद श्री गणपतीनं मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement