घरात नकारात्मक ऊर्जा आहे? करा सैंधव मिठाचे 'हे' साधे उपाय; मानसिक तणाव आणि कौटुंबिक कलह होतील दूर
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार सैंधव मीठ हे शुद्धतेचे व सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. उत्तराखंडचे ज्योतिष अजॉय कोठारी यांच्या मते, सैंधव मिठात अशी ऊर्जा असते जी नकारात्मकता शोषून घेते. आठवड्यातून दोन...
प्रत्येकालाच सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. पण कधीकधी खूप प्रयत्न करूनही अडचणी काही संपत नाहीत. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्र आपल्याला योग्य मार्ग दाखवते. वास्तुशास्त्रानुसार, काही खास उपाय केल्याने आपण आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतो आणि सकारात्मकता आणू शकतो. या उपायांपैकीच एक आहे रॉक सॉल्ट म्हणजेच सैंधव मीठ वापरणे. सैंधव मीठ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशाही बदलू शकते.
advertisement
उत्तराखंडमधील ऋषिकेशचे ज्योतिषी अजय कोठारी यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले की, वास्तुशास्त्रामध्ये सैंधव मीठ शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. यात विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते, जी नकारात्मकता शोषून घेते आणि वातावरणाला शुद्ध करते. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून मानसिक तणाव, कुटुंबातील वाद किंवा आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल, तर सैंधव मिठाचे हे उपाय तुमच्यासाठी चमत्कारी ठरू शकतात.
advertisement
फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा : जर तुम्हाला तुमच्या घरात शुद्ध आणि सकारात्मक वातावरण हवे असेल, तर आठवड्यातून किमान दोनदा फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे सैंधव मीठ मिसळा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मानसिक शांती टिकून राहते. ज्या घरांमध्ये सतत भांडणे किंवा आजारपण असते, त्यांच्यासाठी हा उपाय विशेष फायदेशीर आहे.
advertisement
advertisement
advertisement