T20 World Cup : फायनलचे दोन्ही कर्णधार 20 दिवसात कॅप्टनच राहणार नाहीत, कोण घेणार जागा? नाव ठरलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल मुकाबला थोड्याच वेळात सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल मुकाबला थोड्याच वेळात सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर टीम इंडिया लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम करेल, तसंच 3 टी-20 वर्ल्ड कप जिंकलेली टीम इंडिया एकमेव असेल. टीम इंडियाने याआधी 2007 आणि 2024 सालचा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडला अजून एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही, त्यामुळे पहिला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी न्यूझीलंड मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाविरुद्ध आतापर्यंत 3 वेळा टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच खेळल्या आहेत, यातल्या तिन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला आहे. आता अहमदाबादच्या मैदानात नेमका कोणता विक्रम होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
advertisement
दोघं राहणार नाहीत कॅप्टन
टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे तर न्यूझीलंडचं नेतृत्व मिचेल सॅन्टनरकडे आहे, पण टी-20 वर्ल्ड कप फायनल खेळणारे हे दोन्ही कॅप्टन पुढच्या काही दिवसांमध्ये कॅप्टनच राहणार नाहीत, एवढंच नाही तर दोघंही एकाच टीमकडून खेळणार आहेत. टी-20 वर्ल्ड कप फायनल संपल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल 2026 ला सुरूवात होणार आहे. आयपीएलमध्ये मिचेल सॅन्टनर आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सकडून खेळतील, पण या दोघांनाही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळावं लागणार आहेत.
advertisement
मुंबई इंडियन्सची टीम
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, दानिश मालेवार, हार्दिक पांड्या, मिचेल सॅन्टनर, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, शरफेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश, राज अंगद बावा, अथर्व अंकोलेकर, क्विंटन डिकॉक, रायन रिकलटन, रॉबिन मिन्झ, कृष्णन श्रीजित, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, मयंक मार्कंडे, अल्लाह गझनफर, रघू शर्मा, अश्विनी कुमार, मोहम्मद इजहार, मयंक रावत
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
Mar 08, 2026 4:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : फायनलचे दोन्ही कर्णधार 20 दिवसात कॅप्टनच राहणार नाहीत, कोण घेणार जागा? नाव ठरलं!









