हे फूल अर्पण केल्यास भगवान शंकर होतात क्रोधित: घरात वाढू शकतो कलह, पौराणिक कथांमध्ये आहे उल्लेख
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
हिंदू धर्मात श्रावण महिन्यात शिवपूजेला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शंकराची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून भाविक उपवास, अभिषेक करतात. भगवान शंकराची पूजा करताना हे फूल अर्पण केलं जात नाही.
हिंदू धर्मात देवदेवतांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या फुलांचा वापर केला जातो. सामान्यतः संबंधित देवतेच्या आवडीची फुलं पूजेसाठी निवडली जातात. आवडतं फूल अर्पण केल्यास देव-देवतांची कृपादृष्टी लाभते असं मानलं जातं. भगवान शंकराची पूजा करताना केतकी अर्थात केवड्याचं फूल अर्पण केलं जात नाही. यामागे काही कथा सांगितल्या जातात. या कथांना अनुसरून केतकीचं फूल भगवान शंकराच्या पूजेत वर्ज्य मानलं जातं.
advertisement
हिंदू धर्मात श्रावण महिन्यात शिवपूजेला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शंकराची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून भाविक उपवास, अभिषेक करतात. भगवान शंकराची पूजा करताना केतकीचं फूल अर्पण केलं जात नाही. शिवपूजेसाठी हे फूल वर्ज्य मानलं जातं. यामागे काही कथा आणि कारणं सांगितली जातात. सामान्यतः केतकीचं फूल हे रात्री उमलतं. त्यामुळे त्याचा संबंध नकारात्मक शक्तींशी जोडला जातो. शिवलिंगावर केतकीचं फूल वाहिल्याने शिवलिंगाचं पावित्र्य दूषित होतं असं मानलं जातं. केतकीचं फूल इतर देवतांना अर्पण करता येतं. ते भगवान शंकराला अर्पण करू नये, असं मानलं जातं.
advertisement
शिवपुराणानुसार, केतकीचं फूल हे राक्षसिणीचं रूप होतं. या राक्षसीने भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. भगवान शंकर प्रसन्न होऊन तिला वरदान देऊ इच्छित होते; पण ती राक्षसीण असल्याचं ब्रह्मदेवाने शंकराला सांगितलं. ब्रह्मदेवाचं म्हणणं ऐकून भगवान शंकरानं तिला असा शाप दिला, की 'तू कायम फुलाच्या रूपात राहशील. भगवान शंकराच्या पूजेत या फुलाचा कधीच वापर केला जाणार नाही.' त्यामुळे केतकीच्या फुलात अशुभ शक्ती समाविष्ट झाली. त्यामुळे हे फूल अर्पण केल्यास भगवान शंकर क्रोधित होतात आणि घरात कलह वाढतात असं मानलं जातं.
advertisement
advertisement